शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
5
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
6
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
7
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
8
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
9
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
10
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
11
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
12
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
13
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
14
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
15
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
16
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
17
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
18
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
19
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
20
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)

राज्य बालनाट्य स्पर्धेत दामले विद्यालयाला तब्बल पाच पारितोषिके

By admin | Updated: January 14, 2015 00:39 IST

सावित्रीची लेक : पाचजणांनी मिळवली वैयक्तिक पारितोषिके, कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर

रत्नागिरी : शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाच्या ‘सावित्रीची लेक’ या बालनाट्याला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्राच्या प्राथमिक ेफेरीत तब्बल पाच वैयक्तिक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. यामध्ये अभिनयाच्या तीन पारितोषिकांसह नेपथ्य व प्रकाश योजनेसाठी प्रथम क्रमांक प्राप्त पारितोषिकांचा समावेश आहे. यशाबद्दल शाळेवर सर्व थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे कोल्हापूर व पुणे येथे २ ते ९ जानेवारी दरम्यान ३८ नाट्यप्रयोग सादर झाले. यामध्ये कोल्हापूर येथे दामले विद्यालयाने शाळेचे शिक्षक योगेश कदम यांनी लिहिलेल्या ‘सावित्रीची लेक’ या बालनाट्याचे सादरीकरण केले. गरीब आणि अशिक्षित वडिलांचा मुलीच्या जन्माला, शिक्षणासाठी असणारा कडाडून विरोध आणि त्याविरोधात मुलीच्या शिक्षणासाठी लढणारी त्यांची बायको, तसेच शिक्षणाची आस असणारी मुलगी यांच्या जीवनावर भाष्य करणारे हे बालनाट्य आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलीच्या शिक्षणासाठी धैर्याने उभ्या राहणाऱ्या सावित्रीचे महत्त्व या बालनाट्यातून मांडण्यात आले.स्पर्धेत सुकन्या शिंदे, सीमा दसाणा आणि निरंजन सागवेकर या विद्यार्थ्यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. याशिवाय शाळेचे शिक्षक रवींद्र शिंदे यांना उत्कृष्ट नेपथ्यासाठी प्रथम क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे पारितोषिक, तर प्रकाशयोजनेसाठी प्रथम क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे पारितोषिक या बालनाट्यासाठी अजिंक्य केसरकर यांना प्राप्त झाले आहे. या बालनाट्याला यापूर्वी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता. त्याचप्रमाणे मालवण येथे झालेल्या कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेत याच बालनाट्याने अभिनय, दिग्दर्शनासह द्वितीय क्रमांक पटकावला होता.या बालनाट्यात निरंजन सागवेकर, सुकन्या शिंदे, सीमा दसाणा, रोनक साळवी, साक्षी देसाई, साहील चव्हाण, श्रेयश काटकर, अमेय अणावकर, स्वप्नाली आखाडे, रिक्ता मोरे, प्रफुल्ल पाटील, सिया शिंदे, तन्वी पवार, निरंजन तेंडुलकर, साईराज आखाडे, श्रद्धा साटविलकर, साक्षी कांबळे, यश माने, हर्षवर्धन कदम या विद्यार्थ्यांनी भूमिका पार पाडल्या. या बालनाट्यासाठी योगेश कदम (लेखक), शाहबाज गोलंदाज (दिग्दर्शक), अजिंक्य केसरकर (प्रकाशयोजना), रवींद्र शिंदे (नेपथ्य), साई शिर्सेकर (पार्श्वसंगीत), दीपक सागवेकर, संदीप पवार (रंगभूषा), जयश्री तरळ, पूर्वा मिरकर, शीतल पवार (वेशभूषा) यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांच्यासह पालकांनी विशेष मेहनत घेतली. या यशाबद्दल नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, शिक्षण सभापती शिल्पा सुर्वे, नगरसेवक सुदेश मयेकर, डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता सुशील शिवलकर, दीपा सावंत, नगर परिषद शिक्षण मंडळ सभापती मंजिरी साळवी, प्रशासन अधिकारी आर. एम. जारवाल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुुंडलिक कांबळे यांनी शाळेचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)