शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खेडमधील पिंपळवाडी धरणाचा बांध ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 18:05 IST

Flood Khed Ratnagiri: खेड तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देखेडमधील पिंपळवाडी धरणाचा बांध ढासळलाशंभरहून अधिक ग्रामस्थ स्थलांतरित

खेड : तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे काम करणारा ठेकेदार या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी सरकारने तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील पिंपळवाडी धरणाला गुरुवारी (२२ रोजी) रात्रीच्या सुमारास मोठा धोका निर्माण झाला होता. धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे सुरू असलेले बांधकाम या कामाचा ठेका असलेल्या कंपनीने अर्धवट केल्याने धरणाच्या दरवाज्यातून विसर्ग होत असलेले पाणी या संरक्षक भिंतीवरून थेट धरणाच्या मुख्य बंधाऱ्यावरून वाहू लागले.

या पाण्याच्या प्रवाह एवढा मोठा होता की, काही क्षणात धरणाच्या भिंतीचा तब्बल पंचवीस टक्के भाग ढासळून तेथील माती वाहून गेली. गेल्याच वर्षी २ कोटी रुपये खर्च करून सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले होते.अतिवृष्टीच्या काळात पिंपळवाडी धरणाला धोका निर्माण झाल्याचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी जाहीर करत धरणाच्या लाभ क्षेत्रातील नदी किनारच्या सुमारे सात गावातील शेकडो ग्रामस्थांना स्थलांतरित केले.जलसंपदा विभागाचे सहकार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगल यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक मार्गदर्शक भिंतीचे काम ठेकेदाराकडून ५० टक्केच झाले आहे. त्यातच गुरुवारी रात्री ढगफुटी झाल्याप्रमाणे सुमारे ४०० मिलिमीटर पाऊस पडला.

धरण शंभर टक्के भरले व पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सांडव्यामार्गे पाण्याचा विसर्ग होत असताना सांडव्याला मार्गदर्शक संरक्षक भिंत नसल्याने दिशा बदलली व धरणाच्या मुख्य बंधाऱ्यावरून पाण्याचा मोठा जलप्रपात कोसळून धरणाच्या भिंतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले.

यावेळी पाण्याचा प्रवाह थेट लोकवस्तीच्या दिशेने होऊ लागल्याने त्या रात्री नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली. पाण्याच्या प्रचंड वेगाने खोपी बौद्धवाडी व सुतारवाडी यांच्यामधील पूलही वाहून गेला आहे, असे गोविंद श्रीमंगल यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरKhedखेडRatnagiriरत्नागिरी