शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दापोली तालुक्यातील टंचाईग्रस्त कर्दे गावाची जलमित्र पुरस्काराला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 11:47 IST

टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील कर्दे गावाने जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्यावर्षी सन २०१५-२०१६मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या या गावाने केलेल्या उत्कृष्ट कामाची शासनाकडून दखल घेण्यात आली.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त कर्दे गावात आता पाण्याचा मुबलक साठा जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते पुरस्कार देऊन गौरवपावसाचे पाणी जमिनीत मुरविल्याने शिवारातील पाणीसाठ्यात वाढ

दापोली : टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहेदापोली तालुक्यातील कर्दे गावाने जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्यावर्षी सन २०१५-२०१६मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या या गावाने केलेल्या उत्कृष्ट कामाची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे.गावाने केलेल्या कामाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दुसरीकडे या गावातील जलयुक्त शिवार अभियानामुळे शिवारातील पाणीपातळीत कमालीची वाढ होऊन मोहिमेचे फलित आता गावात जाणवू लागले आहेत.समुद्रकिनारपट्टीवर असलेल्या कर्दे गावाच्या एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला प्रचंड डोंगर उतार अशा विचित्र भोगोलिक परिस्थितीत वसलेल्या या गावातील शिवारात पावसाचे पाणी साचून न राहता थेट समुद्र्राला जाऊन मिळत होते.

अशा परिस्थितीत गावाला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवून पाणीटंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत होता. परंतु जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याचवर्षी या गावाची निवड जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झाली व गावाचे भाग्यच उजाळले.या मोहिमेअंतर्गत शिवारात तीन सिमेंट बंधारे, मातीचे दोन बंधारे, दगडी बंधारे, सलग समतल चर, गॅबियन बंधारे विविध कामाच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठविण्यात आले. पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविण्यात येऊ लागल्याने शिवारातील पाणीसाठ्यात वाढ झाली.

पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्यातून कायमस्वरूपी सुटका झाली आहे. पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे नारळ, आंबा-काजूच्या बागांना मुबलक पाणी उपलब्ध झाले असून बागायती शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळायला लागले आहे. गावाच्या पाणीटंचाईबरोबरच शेतकऱ्यांच्या अर्थकारणालाही बळकटी मिळाली आहे .

गावाशेजारी असणाऱ्या डोंगरात सलग समतल चर मारण्यात आल्याने डोंगरातील पाणी त्याचठिकाणी अडविले जाते. डोंगर उत्तरातील पाणी कधीकाळी वाहून जात होते. मात्र आता पावसाचे पाणी अडविण्यात यश आले आहे. दापोली तालुक्यातील कर्दे गावाने उत्कृष्ट काम करून जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार पटकावला आहे.

कर्दे गावाने कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात करून या समस्येतून सुटका करून घेतली आहे. तालुक्यात अजून काही गावे टंचाई ग्रस्त आहेत. अशा गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात होऊन, तालुकाटंचाई मुक्त व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याचवर्षी दापोली तालुक्यातील वनौशीतर्फे पंचनदी या गावाने जिल्हास्तरीय द्वितीय, व कर्दे गावाने उत्कृष्ट काम करून जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. या गावाने मोहिमेत दाखविलेला लोकसहभागसुद्धा तितकाच महत्वाचा आहे. जलयुक्त शिवार अभियान मोहीम शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त असून पुढील काळात दूरगामी फलित या योजनेचे आढळून येतील.मुरलीधर नागदिवे,तालुका कृषी अधिकारी, दापोली

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJalyukt Shivarजलयुक्त शिवार