शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत रमजान ईद पर्यंत शहराला दररोज पाणी पुरवठा

By मेहरून नाकाडे | Updated: April 19, 2023 17:28 IST

संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा

रत्नागिरी : मुस्लिम भाविकांच्या पवित्र रमजान मासची लवकरच सांगता होणार असून रमजान ईद शनिवार दि.२२ रोजी साजरी होणार आहे. रमजान ईद निमित्त शहरातील पाणीपुरवठा ईदपर्यंत दररोज करण्याच्या सूचना मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिल्या आहेत. यामुळे मुस्लिम बांधवांतूनच नाही तर शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त हाेत आहे.भारतीय हवामान विभागाने दक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल् निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहराला केवळ शीळ या एकमेव धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. बाष्पीभवनामुळे शीळ धरणातील पाणीसाठा प्रचंड वेगाने कमी होत आहे. सद्य:स्थितीत धरणात केवळ दि. ६ जूनपर्यंत पुरेल इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

शहरात साडे दहा हजार नळजोडण्या असून शहरासाठी दररोज १८ ते १९ दक्षलक्षधनमीटर पाणी पुरवठा होतो. मात्र ‘अल् निनो’च्या प्रभावामुळे संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी रविवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.मुस्लिम भाविकांचा रमजान ईद सण तोंडावर असून तयारी सर्वत्र सुरू आहे. भाविकांची गैरसोय होवून नये यासाठी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, मुसा काझी, बाळू साळवी, निमेश नायर, सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर, उमर  गालिब मुकादम, जिब्रान तांडेल, करीम वस्ताव यांनी रमजान ईद निमित्त ईद पर्यंत पाणी ठेवण्यासाठी उद्योजक किरण सामंत यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे मागणी केली. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुख्याधिकारी बाबर यांनी मागणीला मान्यता देत ईदपर्यंत शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी