शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सायकलने केला २६ तासात मुंबई-चिपळूण प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:51 IST

Cycling Ratnagiri- राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहनाचालकांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी मूळचा कबड्डीपटू असलेला व सध्या मुंबई वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असलेल्या प्रितेश शिंदे याने मुंबई ते कोळकेवाडी (ता. चिपळूण) हा प्रवास सायकलने केला आहे.

ठळक मुद्देमुंबई वाहतूक शाखेतील प्रितेश शिंदे याचा उपक्रम कोळकेवाडीच्या सुपुत्राचे कौतुक

चिपळूण : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहनाचालकांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी मूळचा कबड्डीपटू असलेला व सध्या मुंबई वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असलेल्या प्रितेश शिंदे याने मुंबई ते कोळकेवाडी (ता. चिपळूण) हा प्रवास सायकलने केला आहे.तालुक्यातील कोळकेवाडी गावचा सुपुत्र असलेल्या प्रितेशने तालुक्यातील कबड्डीचे मैदान चांगलेच गाजवले आहे. महामार्ग पोलीस अंतर्गत अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषणकुमार उपाध्याय यांच्या कार्यालयात प्रितेश हा कार्यरत आहे. महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता जनजागृती करताना प्रितेश याने मुंबई ते चिपळूण - कोळकेवाडी हा प्रवास सायकलने केला.या प्रवासादरम्यान वाहनचालकांना माहितीपत्रक देत मार्गदर्शन केले. शनिवार, दिनांक १९ रोजी सकाळी ९ वाजता प्रितेश हा दादर येथून सायकलने प्रवासाला निघाला. शनिवारी रात्री त्याने महाड येथे विश्रांती घेतली. त्यानंतर महाड येथून पहाटे तीन वाजता तो चिपळूणच्या दिशेने निघाला. रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तो बहादूरशेख नाका येथे पोहोचला. तिथे पोलीस व नागरिकांनी त्याचे स्वागत केले. चिपळूण पोलीस ठाण्यातील कर्मचारी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, प्रितेश याचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.\

टॅग्स :CyclingसायकलिंगRatnagiriरत्नागिरी