शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत निघाली पर्यावरण पूरक गणेशाेत्सवासाठी सायकल रॅली

By शोभना कांबळे | Updated: September 3, 2023 13:15 IST

सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदविणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

शाेभना कांबळे, लाेकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : ‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा, स्वच्छ, सुंदर व हरित रत्नागिरी’ हा संदेश घेऊन जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनातर्फे रविवारी (३ सप्टेंबर) रत्नागिरी शहरात सायकल रॅली काढून जनजागृती केली.

पोलिस कवायत मैदान येथे हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या सायकल रॅलीचा शुभांरभ केला. यावेळी परिविक्षाधीन आयएस अधिकारी डाॅ. जास्मिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, विशेष भू संपादन अधिकारी निशा कांबळे, रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे दर्शन जाधव, महेश सावंत उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, हरित रत्नागिरी, स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी हे तीन उद्देश घेऊन आणि पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करावा. याबाबतची जनजागृती व्हावी यासाठी ३० किलाेमीटरची सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबतची जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायकल चालविणे हा पर्यावरणपूरक असा उपक्रम असल्याने सायकल रॅलीच्या माध्यमातून जनतेला यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचा संदेश देऊ या, असे ते म्हणाले.

ही रॅली पोलिस कवायत मैदान येथून मारुती मंदिर-गोडावून स्टॉप-आरटीओ ऑफीस-कुवारबाव- रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकमार्गे परत कुवारबाव-मारुती मंदिर-जयस्तंभ-रामआळी-गाडीतळ-टिळक आळी-काँग्रेस भुवन- आठवडा बाजारमार्गे येऊन पोलिस कवायत मैदान येथे या रॅलीची सांगता झाली. सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदविणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGaneshotsavगणेशोत्सव