शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी कडक, अत्यावश्यक सेवाही आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 11:29 IST

: ब्रेक द चेनअंतर्गत रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेवरही जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने तसेच भाजी विक्रेते यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देण्याची मुभा दिली आहे. दुकाने उघडलेली दिसल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच औषध दुकानांमधील कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देसंचारबंदी कडक, अत्यावश्यक सेवाही आजपासून बंदकिराणा, भाजीपाला यांची सेवा घरपोच देण्यासाठी मुभा

रत्नागिरी : ब्रेक द चेनअंतर्गत रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेवरही जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने तसेच भाजी विक्रेते यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देण्याची मुभा दिली आहे. दुकाने उघडलेली दिसल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच औषध दुकानांमधील कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे.शासनाने १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून अन्य दुकानांना सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. यानुसार, शुक्रवारी अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश असलेले किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, औषध दुकाने यांच्यासह बेकरी आदी दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असल्याने ही दुकानेही तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक निर्देशानुसार घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचेही आदेश दिले आहेत.शुक्रवारी ही सर्व दुकाने सुरू होती. या दुकानदारांना एका दिवसात माल संपविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. औषधांची दुकाने वगळता अन्य दुकानांना बंदी घालण्यात आल्याने व्यापाऱ्यांमधून पुन्हा तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा सर्वच दुकानदारांना घरपोच देता येणे शक्य नाही. त्यामुळे ही दुकाने बंद राहिली तर या दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे किमान किराणा, दूध, भाजीपाला आदी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली जात आहे.घरपोचलाही अटी लागूअत्यावश्यक सेवा देणारी दुकाने यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत केवळ घरपोच सेवा देता येणार आहे. अशा सेवा पुरविणारे दुकान मालक, तेथील कामगारांचे लवकारत लवकर लसीकरण करावे. पारदर्शक काच अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाइन पेंमेंट इत्यादीचे पालन करावे.नियम मोडल्यास दंडनियमांचा भंग करणाऱ्या दुकानमालक, कर्मचारी किंवा ग्राहकाला पाचशे रुपये दंड केला जाईल. तसेच कोविड सुसंगत वागणुकीचा भंग करणाऱ्या ग्राहकाला माल दिला जात असेल तर दुकानाला एक हजार रुपये दंड केला जाईल. शर्तभंगाची पुनरावृत्ती झाल्यास साथ संपेपर्यंत दुकान बंद करण्याची कार्यवाही केली जाईल.आता टपऱ्याही बंदरस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागेवर खाद्यपदार्थ खाण्यास पुरविता येणार नाहीत. फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सर्व दिवशी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.वृत्तपत्र विक्री सुरूसर्व ठिकाणचे पेपर स्टाल सकाळी १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा निर्णय घेतला आहे. तशी सूचना सर्व तालुक्यांना देण्यात आली आहे. रविवारपासून विक्रेत्यांना ॲन्टीजेन चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी