शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

लावणी, कोळीनृत्य, ठाकरीनृत्य, दिंडी-वारकरी नृत्यांतून महाराष्ट्राची संस्कृती

By शोभना कांबळे | Updated: February 14, 2024 15:34 IST

महासंस्कृती महोत्सवाची रत्नागिरीकरांवर तिसऱ्या दिवशीही मोहिनी

रत्नागिरी : शाहीर नंदेश उमप यांच्या महाराष्ट्राची संस्कृती या कार्यक्रमातील गण,गवळण, लोकगीते, भारुड, लावणी, कोळी नृत्य, ठाकरी नृत्य, दिंडी-वारकरी नृत्यांनी समस्त रसिकांना ठेका धरायला लावला. महासंस्कृती महोत्सवाची रत्नागिरीकरांवर तिसऱ्या दिवशीही मोहिनी कायम होती.पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात शाहीर नंदेश उमप प्रस्तुत ‘महाराष्ट्राची संस्कृती’हा कार्यक्रम मंगळवारी झाला. तत्पूर्वी कोकण नमन कला मंचाच्यावतीने भजनाचा कार्यक्रम झाला. प्रारंभी शाहीर नंदेश उमप, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, उपायुक्त राजकुमार कोले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पत्रकार अलिमियाँ काझी, किशोर मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. त्यानंतर शाहीर उमप यांचे स्वागत करण्यात आले.उमप यांच्या भारदस्त पहाडी आवाजातील नमनाने सुरूवात झाली. गण -गवळण,बहिणाबाईंच्या ओव्या, ग्रामसंस्कृती जागवणारी लोकगीते, दिंडी –वारकरी गीताने अख्या रसिकांना डोलायला लावलं. शाहीर उमप थेट रसिकांमध्ये उतरले. उपस्थितांमधून विठ्ठल नामाचा गजर आणि त्याच्या जोडीला टाळ्या यांनी वातावरण भारुन गेले होते. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो’, ‘लिंगोबाचा डोंगूर आभाळीगेला’ या ठाकर गीतांवरील नृत्यांने आणि यानंतर तमाम महाराष्ट्राच्या लाडक्या लावणीने रसिकांना अक्षरश: वेड लावले.शिट्या-टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पहायला मिळाला. ढोलकीवरील थाप, ताल आणि त्याच्या जोडीला उपस्थितीत प्रेक्षकांकडून मिळाणाच्या टाळ्यांची लयबद्धता यांच्या जुगलबंदीने बराच वेळ रंगत आणली. गीत, संगीत, नृत्य, गायन, वादन, सोंगी भजन, भारुड आदी कलाविष्कारांनी उपस्थितांना दंगवून टाकले.

जाती -धर्माचं सोवळं जाळलं तरच स्वराज्य उजळेल..छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय महाराष्ट्र काय, देशही पूर्ण होऊ शकत नाही. अशा राजांच्या जीवनातील शिवप्रताप दिन पोवाड्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साकारलेल्या पात्राने स्वराज्याच्या उभारणीत अठरापगड जाती, रोहिले, मुस्लीम मावळ्यांचा सहभाग घेतल्याचा आवर्जून उल्लेख केला. शिवाय आजही तंतोतंत लागू पडणारा ‘जाती-धर्माचं सोवळं आपण जाळलं, तरच स्वराज्य उजळेल’ हा मौलिक संदेशही या कार्यक्रमातून दिला.

७३ वर्षीय तरूणाचा उत्साह..शाहीर उमप यांच्या भारदस्त पहाडी आवाजाने ‘पयलं नमन.. ’ ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर गण आणि त्यानंतर झालेल्या ‘कान्हा वाजवी बासरी’ या गवळणने रसिकांची पाऊले थेट मंचावरच थिरकायला सुरुवात झाली. बालकांसोबत ७३ वर्षीय वृदधाच्या नृत्याने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी