शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चरवेलीत टेम्पो-कार धडकेत दापत्य आश्चर्यकारक बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:39 IST

मुंबई- गोवा महामार्गावर पालीनजिक चरवेली बसस्थानकाजवळ शुक्रवारी आयशर टेम्पो व कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघे जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो चारचाकीवरून पलिकडे जाऊन उलटला. या मोटारीतील दांपत्य आश्चर्यकारकरित्या बचावले.

ठळक मुद्देचरवेलीत टेम्पो-कार धडकेत दापत्य आश्चर्यकारक बचावलेरत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दोघांना तातडीने दाखल

रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावर पालीनजिक चरवेली बसस्थानकाजवळ शुक्रवारी आयशर टेम्पो व कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघे जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो चारचाकीवरून पलिकडे जाऊन उलटला. या मोटारीतील दांपत्य आश्चर्यकारकरित्या बचावले.या घटनेची माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी ४.१० वाजता टेम्पो (एमएच ०६, एक्यू ९९४५) मुंबईहून गोव्याला चालला होता. त्याचवेळी समोरून एमएच ०८, आर ८७१२ ही कार चालली होती. चरवेली बसस्टॉप जवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

त्यात कारमधील रत्नागिरीचे नितीन सीताराम पदेरे (वय ५१) व नीलम नितीन पदेरे (वय ४८) हे दापत्य जखमी झाले. पदेरे वांझोळे (ता. संगमेश्वर) येथून आईचे कार्य उरकून रत्नागिरीला चालले होते. ते पोलीस खात्यात आहेत. सध्या ते माळनाका रत्नागिरी येथे राहतात. टेम्पोचालकाचे नाव सुरजकुमार महती आहे.अपघात एवढा भीषण होता की कारच्या टफवरून टेम्पो पलीकडे गेला व उलटला. त्यात कारच्या टफची पूर्ण दामटी झाली आहे. त्यातील दापत्य आश्चर्यकारक रित्या बचावले.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी आली. त्यातून दोघांना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले.अपघातस्थळी लोकांची मोठी गर्दी केली. पाली येथील पोलीस संजय झगडे व महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून वाहने बाजूला केली व वाहतूक सुरळीत केली. परिसरात सर्वत्र या भीषण अपघाताचीच चर्चा सुरू होती.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी