शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला ठोकले टाळे, मंडणगड नगरपंचायत विशेष सभेला गैरहजर राहिल्याने नगरसेवक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 18:44 IST

मंडणगड नगरपंचायतीत शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र, या सभेला प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी हजेरी न लावल्याने नाराज नगरसेवकांनी नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी कार्यालयालाच टाळे ठोकले. सर्व नगरसेवकांनी जिल्हा व महसूल प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या अनुपलब्धतेची कैफियत मांडली.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या अनुपलब्धतेची मांडली कैफियत सभेला मुख्याधिकारीच राहिले होते अनुपस्थित

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीत शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र, या सभेला प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी हजेरी न लावल्याने नाराज नगरसेवकांनी नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी कार्यालयालाच टाळे ठोकले. सर्व नगरसेवकांनी जिल्हा व महसूल प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या अनुपलब्धतेची कैफियत मांडली.मंडणगड नगरपंचायतीची प्रस्तावित विकासकामे व विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी विशेष सभा आयोजित केली होती. मुख्याधिकाऱ्यांकडे कामाचा अतिरिक्त भार असल्याने त्यांच्या सोयीची वेळ लक्षात घेऊन त्यांनी दिलेल्या तारखेनुसार ही सभा बोलावण्यात आली होती.

पण, या सभेला मुख्याधिकारीच अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे नगराध्यक्षांसह उपनराध्यक्ष व नगरसेवकांनी नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी कार्यालयाला टाळे लावले. यावेळी नगराध्यक्ष प्रियांका शिगवण, उपनराध्यक्ष राहुल कोकाटे, नगरसेवक सुभाष सापटे, अ‍ॅड. सचिन बर्डे, शांताराम भेकत, कमलेश शिगवण, आदेश मर्चंडे, राजेश मर्चंडे, आरती तलार, नेत्रा शेरे, श्रध्दा लेंडे, श्रुती साळवी, स्वीकृत नगरसेवक मुंजीर दाभीळकर उपस्थित होते.यासंदर्भात उपनगराध्यक्ष राहुल कोकाटे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी सभेस उपस्थित राहण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. मुख्याधिकाऱ्यांअभावी कोणतेही कामे होत नाही. त्यामुुळे ते सभेला हजर न राहिल्याने संतप्त झालेल्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी कार्यालयाला टाळे लावत असल्याच्या तक्रारीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला ई-मेलच्या माध्यमातून पाठविले आहे.मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत नगरोत्थान योजनेतील १ कोटी रुपयांची व रस्ता अनुदान योजनेतील ४० लाखांच्या निधी विनियोगांच्या कामांच्या निविदा प्रक्रियेवरील मुख्याधिकाऱ्यांच्या सह्यांचे कामकाज आज पूर्ण होणार होते. मात्र, सभाच न झाल्याने हे काम पुढे गेले आहे.मार्चआधी हा निधी खर्च न केल्यास ते परत जाण्याचा धोका आहे. शिवाय आज पाणी समस्येवर तत्कालीन उपाययोजना, शहर विकास आराखडा या महत्त्वाच्या विषयांवर निर्णायक कामकाज केले जाणार होते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMuncipal Corporationनगर पालिका