शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Coronavirus Unlock : ... तर बायको, मुलांसह जेलभरो आंदोलन, नाभिक समाज अधिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 14:12 IST

सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. सलून व्यवसाय बंद असल्याने एका समाज बांधवाने शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केला, ही शोकांतिका आहे. १५ जूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही, तर १६ तारखेपासून बायको आणि मुलांसह जेलभरो आंदोलन करू, असा इशारा नाभिक समाज हितवर्धक मंडळ आणि कोविड समिती जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे... तर बायको, मुलांसह जेलभरो आंदोलन, नाभिक समाज अधिक आक्रमकशासन धोरणाविरोधात संतापाची भावना, १६ जूनपासून रस्त्यावर उतरण्याचा इशारा

रत्नागिरी : सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. सलून व्यवसाय बंद असल्याने एका समाज बांधवाने शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केला, ही शोकांतिका आहे. १५ जूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही, तर १६ तारखेपासून बायको आणि मुलांसह जेलभरो आंदोलन करू, असा इशारा नाभिक समाज हितवर्धक मंडळ आणि कोविड समिती जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांनी दिला आहे.रत्नागिरी शहरात एकूण १७० व ग्रामीण भागात १३० सलून अशी संपूर्ण तालुक्यात जवळपास ३०० ते ४०० सलून आहेत. या दुकानांमध्ये काम करणारे ५०० कारागीर धरले तर या सलून व्यवसायाचे मालक व कारागीर यांची मिळून हजारो कुटुंब आज लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाली आहेत. रोजच्या मिळणाऱ्या उत्पन्नावरच नाभिक समाजाच्या संसाराची तारेवरची कसरत सुरू असते. लॉकडाऊनच्या काळात सर्व सलून चालक, मालक, कारागीर यांनी शासनास सहकार्य करून आपली दुकाने बंद ठेवली. पण शासनाने नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केले व सलून दुकाने उघडण्यास आजही परवानगी नाकारली आहे.

उदरनिर्वाहसाठी पारंपरिक नाभिक व्यवसायाशिवाय इतर साधन नाही. ९० टक्के लोकांकडे शेती नाही, दुकानेही भाड्याने घेतली आहेत. त्यामुळे भाडे, वीजबिल, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर उधार उसनवारी आदी खर्च कसा करायचा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.गेले तीन महिने सलून व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाची गुजराण कशीतरी सुरू आहे. मात्र, आता सहनशक्ती संपली आहे. दुकाने उघडण्यास शासन परवानगी देत नसेल तर उपाशी मारण्यापेक्षा रस्त्यावर उतरू आणि आपला हक्क मिळवू, असे अनेकांनी म्हटले आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ येथील नाभिक समाजातील एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने नाभिक समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. सरकार अजूनही समाज बांधवांना न्याय देणार नसेल तर रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत समाज बांधव आहेत.याबाबत बोलताना श्रीकृष्ण चव्हाण यांनी सांगितले की, आमच्या एका समाज बांधवाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला चार वर्षांचं छोट मूल आहे. आज व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत खासदार शरद पवार, खासदार विनायक राऊत, मंत्री उदय सामंत, विधानपरिषद आमदार प्रसाद लाड, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्यातील सर्व आमदार यांना निवेदन देण्यात आली आहेत. त्यांच्याकडे नाभिक समाजाच्या भावना पोहोचविण्यात आल्या आहेत. सरकार अजूनही गांभीर्याने घेत नाही. लढा लढतोय, समाज रस्त्यावर उतरत आहे, तरीही त्याची दखल शासनाकडून घेतली जात नाही, असे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, शासनाने आमच्या भावनांचा विचार करून सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. आम्ही हत्यारबंद आंदोलन सुरू केलेले आहे. तरीही शासन त्याची दखल घेत नाही. त्यामुळे आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ तारखेपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही तर १६ तारखेपासून आम्ही बायको, मुले यांच्यासह जेलभरो आंदोलन करू, असा इशाराही दिला. आम्ही सलून उघडणार, काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहोत. सरकारने कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत, सरकारने आमच्यावर कारवाई करून आम्हाला जेलमध्ये पोसावे, असेही त्यांनी सांगितले.विविध मागण्याशासनाने सलून दुकान उघडण्यास परवानगी द्यावी, नाभिक समाजातील प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात १५ हजार रुपये जमा करावेत, सलून व्यावसायिकाला ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे. सलून व्यावसायिकांना सुरक्षितता किट पुरवावेत, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकRatnagiriरत्नागिरी