शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दापोलीत गरोदर महिलेला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:57 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावातील एका ९ महिन्याच्या गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. खबरदारीचा म्हणून त्या महिलेला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णालयात तिच्यावर उपचार करून तिची सुखरूप प्रसुती करण्याचे मोठे आव्हान आता वैद्यकीय अधिकाऱ्यासमोर आहे.

ठळक मुद्देदापोलीत गरोदर महिलेला कोरोनाची बाधामहिला उपचारासाठी रत्नागिरीत, महिलेवर राहणार विशेष लक्ष

शिवाजी गोरेदापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावातील एका ९ महिन्याच्या गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. खबरदारीचा म्हणून त्या महिलेला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णालयात तिच्यावर उपचार करून तिची सुखरूप प्रसुती करण्याचे मोठे आव्हान आता वैद्यकीय अधिकाऱ्यासमोर आहे.या महिलेच्या प्रवासाचा इतिहास मुंबई आहे. ही महिला मुंबईतून १८ तारखेला आपल्या गावी आली होती. ही महिला गरोदर असल्याने नियमित तपासणीसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आली होती. मात्र, तिच्यामध्ये लक्षणे जाणवू लागल्याने २६ मे रोजी तिचे स्वॅब घेण्यात आले होते. २८ मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रात्री तिला गावातून नेण्यात आले आहे.ही महिला नऊ महिन्यांची गरोदर असल्याने तिची विशेष काळजी घेण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार तिला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. त्याठिकाणी एका स्वतंत्र खोलीत तिची देखभाल केले जाणार आहे. तसेच तिच्यासोबत तिच्या एका नातेवाईकाला सुद्धा राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्या महिलेचा प्रसुती कालावधी जवळ आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तिच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.दापोली तालुक्यातील खेर्डी देवके व केळशी या तीन गावांमध्ये १६ ते १८ मे यादरम्यान मुंबईतून आलेल्या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वॅब घेतले होते. तसेच गावातील ग्राम कृती दलाने सुद्धा त्यांची खबर आरोग्य विभागाला दिली होती. त्यामुळेच त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यास मोठी मदत झाली.

देवके व खेर्डी येथील दोन्ही पुरुष क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. पण केळशी येथील महिला होम क्वारंटाईन करण्यात आली होती. त्यांचा इतिहास तपासण्याचे काम सुरू आहे. हे तीनजण कोणाकोणाच्या संपर्कात आले होते त्यांचे नमुने घेतले जाणार आहेत.तसेच देवकी व केळशी या तीनही गावांमध्ये कंटेनमेंट ची तयारी सुरू आहे. यापैकी देवके या गावांमध्ये यापूर्वी काही लोक आढळले होते त्यामुळे देवके यापूर्वी कंटेनमेंट घेऊन म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र कंटेनमेंट उठण्याआधीच पुन्हा एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या गावामधला कंटेनमेंट कायम ठेवण्यात येणार आहे. तसेच खेर्डी या दोन गावांमध्ये नव्यानेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या दोन्ही गावांमध्ये आता कंटेनमेंट झोन लावण्यात येणार आहे.कोरोनाबाधित ९ महिन्याच्या गरोदर महिलेच्या पतीचा सलून हा व्यवसाय आहे. ते अनेक जणांच्या संपर्कात आल्याने केळशी गावात एकच खळबळ उडाली आहे गावातील अनेक जण त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे आता प्रशासनाकडून १४ दिवसाचा इतिहास तपासला जाणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवा बिरादार यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी