शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

corona virus : कामगारांच्या चारित्र्य पडताळणीला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 17:31 IST

Coronavirus, ratnagiri, police, पूर्वी शासकीय सेवेसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य असायचे. पण आता उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी खासगी आस्थापना तसेच विविध परवान्यांसाठीही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागितले जात आहे.

ठळक मुद्देकामगारांच्या चारित्र्य पडताळणीला कोरोनाची बाधाप्रमाणपत्रांचे काम मंदावले

शोभना कांबळेरत्नागिरी : पूर्वी शासकीय सेवेसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य असायचे. पण आता उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी खासगी आस्थापना तसेच विविध परवान्यांसाठीही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागितले जात आहे.यापूर्वी शासनाच्या सेवेत रूजू होण्यासाठी पोलीस विभागाकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. मात्र, बदलत्या काळानुसार गुन्हेगारीत वाढ होऊ लागल्याने आता शासकीयबरोबरच खासगी आस्थापनांमध्येही उमेदवाराचे चारित्र्य पाहिले जाते. त्यामागे गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये, यासाठी उमेदवाराला पडताळणी प्रमाणपत्र दाखल करावे लागते.

गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीसाठीही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. तसेच शासकीय समितीवर निवड, विविध शासकीय परवाने, बँकांमध्ये नोकरी, विविध उद्योग, कारखाने, खासगी आस्थापना, सुरक्षारक्षकांची भरती आदींसाठी पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते.गेल्यावर्षी १०,२८३ ऑनलाईन आणि ३३० ऑफलाईन अशी एकूण १०,६१३ प्रमाणपत्र पोलीस विभागाकडून देण्यात आली होती. मात्र, यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने एप्रिल ते जुलै या कालावधीत पडताळणीची संख्या कमी आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा पडताळणीसाठीचे प्रस्ताव वाढू लागले असून, ३ डिसेंबरपर्यंत ही संख्या ६,८१४ झाली आहे.दोन वर्षांत १७,४२७ कर्मचाऱ्यांची पडताळणीगेल्यावर्षी १०,६१३ विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी पोलीस विभागाकडून करण्यात आली होती. यावर्षी कोरोनामुळे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत कमी प्रस्ताव दाखल झाले. मात्र, तरीही जून ते ३ डिसेंबर २०२० या कालावधीत ६,८१४ प्रमाणपत्रे देण्यात आली.पडताळणीसाठी असा करा अर्जपडताळणी जलदगतीने होण्यासाठी २०१७ सालापासून ऑनलाईन प्रणाली सुरू झाली आहे. त्यासाठी pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. त्यासोबत आधार, पॅनकार्ड आदी कागदपत्रे जोडावी लागतात.

कुठेही काम करताना उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही ना, हे पाहिले जाते. आता तर कुठल्याही ठिकाणी त्याच्याकडून गुन्हा घडला असेल, तर महाराष्ट्रात कुठेही चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला तरी त्यावर त्याने केलेला गुन्हा नमूद होतो.- हेमंतकुुमार शहा,पोलीस अधिकारी

उद्योग किंवा कारखान्याची विश्वासार्हता महत्त्वाची असते. त्यामुळे त्यात काम करणारे कर्मचारी हेही विश्वासू असावे लागतात. याठिकाणी काम करणाऱ्या कामगाराला जर कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, तर ती त्या उद्योगासाठी घातक असते. त्यासाठी त्याला कामावर घेतानाच त्या उमेदवाराची चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे असते.- अभिजीत जाधव, उद्योजक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसGovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी