राजापूर : कोरोनाचा दिवसागणिक फैलाव वाढत असताना कोरोनाचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धसका घेऊन रुग्णालयातून पळालेल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचा प्रकार उघडकीला आहे. हा प्रकार जिल्हा रुग्णालयामध्ये घडला. असून, राजापूर तालुक्यातील भू येथील रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.तालुक्यातील भू येथील एका व्यक्तीला गेल्या बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असे सांगण्यात आले. तालुका प्रशासनाने तातडीने भू येथील तीन वाड्या कंटेन्मेंट झोन घोषित करून पुढील कार्यवाही सुरू केली. भू येथील व्यापाऱ्यांनीही खबरदारी म्हणून तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय तातडीने घेतला.दरम्यान, अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच भीतीमुळे त्या रूग्णाने जिल्हा रुग्णालयातून पलयान केले. त्यानंतर उडालेल्या गोंधळामध्ये त्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगत जिल्हा रुग्णालयाकडून चूक झाल्याची कबुली देण्यात आली.
corona virus : रूग्णालयातून पळालेला रुग्ण निघाला निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 16:32 IST
CoronaVirus, hospital, ratnagirinews कोरोनाचा दिवसागणिक फैलाव वाढत असताना कोरोनाचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धसका घेऊन रुग्णालयातून पळालेल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचा प्रकार उघडकीला आहे. हा प्रकार जिल्हा रुग्णालयामध्ये घडला. असून, राजापूर तालुक्यातील भू येथील रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.
corona virus : रूग्णालयातून पळालेला रुग्ण निघाला निगेटिव्ह
ठळक मुद्देपॉझिटिव्ह आल्याचा घेतला धसका पॉझिटिव्ह सांगताच तीन वाड्या कंटेन्मेंट