शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : रत्नागिरीतील क्वारंटाईन केंद्रात असुविधांचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 16:45 IST

परदेशातून सुखकर प्रवास करून रत्नागिरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल झाले. रत्नागिरीतील सिंचन भवनातील क्वारंटाईन केंद्रातील गैरसोयींमुळे हाल झाले. या गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर काही पालकांनी आपल्या मुलांची इतरत्र व्यवस्था केली होती.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला संताप परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल

रत्नागिरी : परदेशातून सुखकर प्रवास करून रत्नागिरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल झाले. रत्नागिरीतील सिंचन भवनातील क्वारंटाईन केंद्रातील गैरसोयींमुळे हाल झाले. या गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर काही पालकांनी आपल्या मुलांची इतरत्र व्यवस्था केली होती.परदेशात शिक्षण घेणारे काही विद्यार्थी सोमवारी रात्री रत्नागिरीत दाखल झाले. रत्नागिरीतील दामले हायस्कूल येथे स्वॅब घेतल्यानंतर त्यांना सिंचन भवन येथील विश्रामगृहात क्वारंटाईन करण्यात आले. मात्र, हे विद्यार्थी तेथे पोहोचल्यानंतर असुविधांचा सामना करावा लागला. क्वारंटाईन केंद्रात बेड नाही, गाद्या नाहीत, अशी परिस्थिती होती. त्यातही केंद्रात पाण्याची सुविधा नसल्याचेही पाहायला मिळाले.केंद्रातील खोल्यांमधील शौचालय गेले सहा महिनेच साफ केले नसल्याचे विदारक चित्र विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना पाहायला मिळाले. हे विदारक चित्र पाहिल्यानंतर रात्री उशिरा विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्वत: खोल्या साफ करून घेतल्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आले. मात्र, काही नातेवाईकांनी येथील परिस्थिती पाहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना अन्यत्र नेण्याचा निर्णय घेतला. अखेर केंद्रात कोणतीही नोंद न करता त्या विद्यार्थ्यांना त्यांनी अन्यत्र नेले. क्वारंटाईनसाठी असलेल्या केंद्रातील गैरसोयीबाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.संतप्त भावनासिंचन भवनाच्या विश्रामगृहातील क्वारंटाईन केंद्रात दोन पोलीस आणि शिक्षक कार्यरत होते. क्वारंटाईन केंद्रात नक्की माणसे ठेवतात का, असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणीही केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी