शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : बारमधील गर्दी आटली, आता घरातच उघडते बाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:24 IST

Coronavirus Unlock, Hotel, Ratnagirinews लॉकडाऊन काळात बार बंद असताना घरीच बसण्याची सवय लागलेल्या लोकांची पावले आता बारकडे वळत नाहीत. त्याऐवजी आता लोक घरातच बसून मद्यपान करत असल्याचे समोर येत आहे. आता बार सेवेत हजर झाले असले तरी त्यातील गर्दी ५० टक्क्यांहून अधिक घटली आहे.

ठळक मुद्देबारमधील गर्दी आटली, आता घरातच उघडते बाटलीकोरोनामुळे बारमधील गर्दी घटली

मनोज मुळ्येरत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रावर काही का काही परिणाम झाले. काही व्यवसाय पूर्णपणे बंद झाले तर काही नवीन व्यवसाय उदयास आले. असाच एक बदल झाला तो बारमधील हजेरीवर. लॉकडाऊन काळात बार बंद असताना घरीच बसण्याची सवय लागलेल्या लोकांची पावले आता बारकडे वळत नाहीत. त्याऐवजी आता लोक घरातच बसून मद्यपान करत असल्याचे समोर येत आहे. आता बार सेवेत हजर झाले असले तरी त्यातील गर्दी ५० टक्क्यांहून अधिक घटली आहे.मार्च महिन्यापासून अनेक गोष्टींमध्ये बदल झाले. सुरूवातीच्या काळात कोरोनाची तीव्रता वाढत असताना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. त्यावेळी बार, वाईन मार्ट बंद झाले. जिकडे-तिकडे याचीच चर्चा अधिक होती.

सोशल मीडियावर मीम्सनी धुमाकूळ घातला होता. बाकी काही नको, किमान वाईन मार्ट तरी सुरू करा, असा मुद्दा अनेक बाजूंनी पुढे आणला गेला. सरकारनेही महसूल बुडतो असे कारण देत वाईन मार्ट सुरू करण्याला परवानगी दिली.अनेक महिने बार बंद असल्याने मद्य पिणाऱ्यांची संख्या घटली नाही, उलट बाहेर गेल्यावर कोरोनाची भीती आहे म्हणून घरातच मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढली. आता बार उघडून अनेक दिवस झाले असले, तरी बारमध्ये पहिल्यासारखी गर्दी होत नाही. नेहमी येणारे जवळपास ५० ते ६० टक्के लोक आता बारमध्ये येत नाहीत. कोरोनामुळे लोक घरीच मद्यपान करत असल्याने बारमधील गर्दी घटली असल्याचे अनेक बारमालकांनी सांगितले.नाईलाजाने का होईना..कोरोना दाखल झाल्यापासून बार बंद झाले. बाहेर पडल्यास कोरोनोचा धोका असल्याने अनेक पुरूषांना नाईलाजाने का होईना पण घरातच मद्यपान करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे बारमध्ये नियमित जाणारेही आता आम्ही घरीच बसतो, असे आवर्जून सांगतात.व्यवसायावर मोठा परिणामएका बारशी निगडीत अनेक पद्धतीचा व्यवसाय चालतो. स्टार्टर म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ, बारमधील कामगार, जेवण बनवणारे असे अनेकजण त्यावर अवलंबून असतात. मात्र, आता बारमधील गर्दी कमी झाल्यामुळे हे सर्व गणित जुळवायचे कसे, असा प्रश्न आता हॉटेल मालकांसमोर उभा आहे. लोकांची गर्दी कमी होत असल्याने बारचा कोट्यवधींचा व्यवसाय आता खूप कमी होऊ लागला आहे.अहो, घरीच बसाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या कामाखेरीज बाहेर पडू नका, घरातच बसा... या सरकारच्या आवाहनाची खूप खिल्ली उडवली गेली. मंदिरे, वाचनालये उघडण्याआधी वाईन मार्ट सुरू झाल्याने घरीच बसा या वाक्यावर सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल झाले आणि नंतर ते प्रत्यक्षातही आले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेलRatnagiriरत्नागिरी