शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लोटेत गोवा बनावटीचा मद्याचा मोठा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 11:58 IST

liquor ban Chiplun Ratnagiri-खेड तालुक्यातील लोटे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून ६० हजार रुपये किमतीचा गोवा बनावट विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला तसेच संगमेश्वर तालुक्यातील कुंचाबे येथे गावठी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत विकी अशोक गोरीवले (३९, रा. चिपळूण) व मनोज पांडुरंग जागुष्टे (४६, रा. कुचांबे, संगमेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचा छापा, दोघांवर गुन्हे दाखल अवैध दारू विक्रीविरोधात जोरदार मोहीम

चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून ६० हजार रुपये किमतीचा गोवा बनावट विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला तसेच संगमेश्वर तालुक्यातील कुंचाबे येथे गावठी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत विकी अशोक गोरीवले (३९, रा. चिपळूण) व मनोज पांडुरंग जागुष्टे (४६, रा. कुचांबे, संगमेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी अवैध दारूविरोधात मोहीम सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची विक्री व वाहतूक होऊ नये म्हणून अधीक्षक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी विशेष नियोजन केले आहे.

दरम्यान, खेड तालुक्यातील लोटे येथे गोवा बनावट विदेशी मद्याचा साठा केला असल्याची माहीती भरारी पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी गोवा बनावट गोल्डन एस व्हिस्कीचा ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच भरारी पथकाने केलेल्या दुसऱ्या कारवाईत १३०० रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली. ही कारवाई संगमेश्वर-कुचांबे येथे करण्यात आली. भरारी पथकाचे निरीक्षक शरद जाधव, जवान निनाद सुर्वे, सहकारी महेश पाटील, रोहन तोडकरी यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी