शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona vaccine : चिपळुणात १५ वर्षाच्या मुलाला दिला 'डबल डोस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 16:46 IST

मुळात डोस देताना नोंदणी केली जाते. तसेच टोकनही दिले जातात तरीही हा प्रकार घडला कसा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

चिपळूण : १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोविड लसीचा डोस दिला जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. मात्र तालुक्यातील फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रात एका १५ वर्षीय मुलाला लसीचा डबल डोस दिल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. संबंधित मुलाला कामथे उप जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी शहरातील ३८० जणांना लस देण्यात आली. मात्र आता ग्रामीण भागात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अशातच तालुक्यातील फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रात  एका १५ वार्षिय मुलाला एकाचवेळी दोन डोस दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. सकाळी १०.३० वाजता हा प्रकार घडला. तुर्तास या मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. मात्र तरीही त्याला कामथे उप जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी दिली. मुळात डोस देताना नोंदणी केली जाते. तसेच टोकनही दिले जातात तरीही हा प्रकार घडला कसा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस