शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

गुहागरच्या पर्यटन हंगामावर कोरोनाने संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST

पर्यटकांवर अवलंबून असलेल्यांची बिकट अवस्था लाेकमत न्यूज नेटवर्क असगोली : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू असलेल्या गुहागरात शाळा व महाविद्यालयाच्या परीक्षा ...

पर्यटकांवर अवलंबून असलेल्यांची बिकट अवस्था

लाेकमत न्यूज नेटवर्क

असगोली : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू असलेल्या गुहागरात शाळा व महाविद्यालयाच्या परीक्षा संपल्यानंतर पर्यटक मोठी गर्दी करतात. तालुक्यात या पर्यटन हंगामात दिवसाला सुमारे ६,५०० पर्यटक येत असतात. यामध्ये सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गुहागरातील पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत, परंतु या वर्षीही गुहागरच्या पर्यटन व्यवसायावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे गेला महिनाभर बंद असलेल्या तालुक्यातील हॉटेल, लॉज च घरगुती राहण्याच्या ठिकाणांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.

पूर्वी गुहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक गेल्या वर्षीचा कोरोना काळ वगळता, आता सलग तीन दिवस वास्तव्य करू लागला आहे. एवढेच नव्हे, तर गुहागरात राहून आता गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटन स्थळे पाहून पुन्हा गुहागरात येऊ लागला आहे. ही येथील पर्यटन सोईसुविधामुळे शक्य झाले आहे. गुहागर हे पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याने कौटुंबिक पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असते. बहुचर्चित एरॉनचा दाभोळ पॉवर प्रकल्प बंद पडल्यानंतर बेरोजगारीचे मोठे संकट तालुक्यावर आले होते. अशा परिस्थितीत निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यटनाने येथील जनतेला रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे हा तालुका पर्यटन व्यवसायावरच जास्त अवलंबू आहे.

कोरोनाच्या संकटामुळे येथील पर्यटन व्यावसायिकांची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेले समुद्रातील बोटिंग, घोडेस्वार, उंट सफरी, खाद्य पदार्थांचे स्टॉल अन्य लहान व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. काही व्यावसायिकांनी पर्यटकांसाठी सोईसुविधा निर्माण करून देण्यासाठी बँकेतून घेतलेले कर्ज फेडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगारही हवालदिल झाले आहेत. पर्यटक आलेच नाही, तर रोजगार कसा मिळणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

....................................

तालुक्यातील हेदवी - नरवण गावात ६ हॉटेल, ४ एमटीडीसी निवासस्थाने, वेळणेश्वरमध्ये निवासस्थाने ४, शृंगारतळीत ६ हॉटेल, २ एमटीडीसी निवासस्थाने, २ परमिट बार, वेलदूर - अंजनवेल येथे ३ हॉटेल, ३ एमटीडीसी निवासस्थान, गुहागर शहरात २० हॉटेल, काही गावांसह तालुक्यात सुमारे ४५ हॉटेल, ३० एमटीडीसी निवासस्थाने व ५८ घरगुती निवास आणि राहण्याची व्यवस्था आहे.

...........................................

कोरानाचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. याचा परिणाम छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योगधंदे, हॉटेल व्यावसायिक व आंबा-काजू बागायतदारांवर झाला आहे. पुढील १० वर्षे मागे गेल्यासारखे होणार आहेत. लाखोंची उलाढाल अचानक थांबल्याने कामगार व कर्मचारी यांच्या रोजगारापुढे आव्हान उभे राहिले आहे, तर ज्यांचे हातावर पोट आहे, अशांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- श्यामकांत खातू, अन्नपूर्णा हॉटेल