रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली शहरातील काँग्रेस भवन कार्यालय येथे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे, असे फलक हातात घेऊन मोदी सरकार हाय हाय, सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेला होता.यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. विजय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, जिल्हा सरचिटणीस दीपक राऊत, मीडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, प्रदेश महिला सरचिटणीस रुपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, जिल्हा चिटणीस तेजश्री गोतंम, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन मालवणकर, महिला तालुकाध्यक्ष रिजवाना शेख, प्रमोद सक्रे, युवकचे दर्शन सक्रे, जयसिंग राऊत तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 16:45 IST
Congress Ratnagiri : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली शहरातील काँग्रेस भवन कार्यालय येथे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
ठळक मुद्देइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन घोषणांनी काँग्रेस भवन परिसर गेला दणाणून