शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनासाठी बिनधास्त या, रत्नागिरी पोलिस अधीक्षकांचे पर्यटकांना आवाहन

By शोभना कांबळे | Updated: May 2, 2023 15:51 IST

बारसूमधील परिस्थितीवरुन जिल्ह्यात ११ मे पर्यंत मनाई आदेश असल्याने पर्यटकांनी येताना खबरदारी घ्यावी, अशा आशयाचे वृत्त सर्वत्र पसरले

रत्नागिरी : जिल्ह्यात २४ एप्रिल ते ११ मे या कालावधीत विविध सण साजरे होणार आहेत. या काळात विविध राजकीय दाैरे तसेच आंदोलने होणार आहेत. या अनुषंगाने या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश कायदा व सुव्यवस्थेसाठी लागू करण्यात आला असला तरी पर्यटनावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. पर्यटकांनी निर्भयपणे जिल्ह्यात पर्यटनासाठी यावे, त्यांना पुर्णपणे सुरक्षा दिली जाईल, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.१ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन असल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ५ मे रोजी बुध्द पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. राजापूर तालुक्यातील बारसु, धोपेश्वर, पन्हेळे तर्फे राजापूर, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ व आजुबाजूच्या परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने २४ एप्रिलपासून माती परिक्षणासाठी ड्रिलींग कामाला सुरुवात करण्यात आली. या कामाला प्रकल्प बाधीत गावातील काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याने या कामादरम्यान स्थानिकांकडून विरोध होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी २४ एप्रिल ते ११ मे या कालावधीत जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेशाद्वारे जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मात्र, जिल्ह्यात ११ मे पर्यंत मनाई आदेश असल्याने पर्यटकांनी येताना खबरदारी घ्यावी, अशा आशयाचे वृत्त सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात यावे की न यावे, अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ११ मे पर्यंत विविध सण साजरे होणार असून काही ठिकाणी मोर्चे - आंदोलनाची स्थितीही निर्माण होणार आहे. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जबावबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे पर्यटनावर काेणताच परिणाम होणार नाही, पर्यटक जिल्ह्यात निर्भयपणे फिरू शकतात, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ११ मे पर्यंत असलेला मनाई आदेश कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी आहे. पर्यटक कुठलीही भीती अथवा संभ्रमावस्था न बाळगता रत्नागिरी जिल्ह्यात निर्भयपणे येऊ शकतात. मनसोक्त पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. त्यांना पुर्णपणे सुरक्षा दिली जाईल. - धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधिक्षक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पtourismपर्यटन