शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

पुढच्या वर्षी लवकर या!

By admin | Updated: September 21, 2015 23:46 IST

विसर्जन थाटात : पाच दिवसांच्या बाप्पांना श्रद्धापूर्ण निरोप

रत्नागिरी : ‘पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोला’, ‘एक दोन तीन चार गणपतीबाप्पांचा जयजयकार’, ‘गणपतीबाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर या’ अशी गणपतीबाप्पांकडे प्रार्थना करीत भाविकांनी गौरीगणपतींचे विसर्जन केले. गेले पाच दिवस उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज विसर्जनानंतर सांगता झाली.भाद्रपद चतुर्थीला जिल्ह्यात एक लाख ६५ हजार ८६ घरगुती तर १०७ सार्वजनिक गणेशमूर्तीची मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणेशचतुर्थीनंतर दीड दिवसांचे २ सार्वजनिक व ९९८० घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते. पाचव्या दिवशी जिल्ह्यातील १६ सार्वजनिक व एक लाख ४ हजार ३६४ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. ढोल ताशे, बेंजो, झांजपथक, लेझीमपथकांत, गुलालाची उधळण करीत गणेश विसर्जनाच्या मिरवणूका काढण्यात आल्या. सायंकाळी आरती झालेनंतर डोक्यावरून हातगाडी, रिक्षा, चारचाकी गाडीतून गणेशमूर्ती विसर्जन स्थळाकडे नेण्यात येत होत्या. वाद्यांना फाटा देत काही मंडळी चक्क भजन म्हणत मूर्ती विसर्जनासाठी नेत होते. गणपती प्रतिष्ठापनेपासून घरोघरी चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण होते. गणपती विसर्जनासाठी नेताना भाविक भावूक झाले होते. त्यामुळेच बाप्पांना लवकर येण्याचे साकडे घालीत गणपतीबरोबर गौरीचे देखील विसर्जन करण्यात आले. गौरी गणपतीबरोबर पाच दिवसातील पूजेचे निर्माल्य भाविकांनी आणले होते. नगरपालिकेच्या कुंडात तसेच भारतीय पर्यावरण शास्त्र तंत्रज्ञान संस्थेने ठेवलेल्या ट्रकमध्ये टाकण्यात येत होते. भारतीय पर्यावरण शास्त्र तंत्रज्ञान संस्थेचे डॉ.श्रीरंग कद्रेकर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व शिरगाव मत्स्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यार्थी निर्माल्य संकलन करीत होते. काही भाविक चक्क पाण्यात सोडत होते. त्यामुळे लाटेबरोबर किनाऱ्यावर आलेले निर्माल्य भाविकांच्या पायाखाली येत होते. तर काही विद्यार्थी किनाऱ्यावरील संकलन गोळा करून ट्रकमध्ये टाकत होते.गणेशमूर्ती घेवून भाविक मांडवी किनाऱ्यावर आलेनंतर निरोपाची आरती करून मूर्ती विसर्जनासाठी उपस्थित स्वयंसेवकांकडे ताब्यात देण्यात येत होती. मांडवी येथील हौशी मंडळाचे कार्यकर्ते सालाबादप्रमाणे विसर्जन करीत होते. विसर्जनस्थळावर प्रचंड गर्दी झाली होती. रात्री उशीरापर्यत विसर्जनासाठी भाविक येत होते.पोलिस प्रशासनाकडूनदेखील मांडवी किनाऱ्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांचा तंबू किनाऱ्यावर लावण्यात आला होता. लाईफ जॅकेटस्ची व्यवस्था करण्यात आली होती. (प्रतिनिधी)पोलिस ठाणेखासगीसार्वजनिकपोलिस ठाणेखासगीसार्वजनिकरत्नागिरी शहर४०१५रत्नागिरी ग्रामीण७६९२०जयगड१७०५२संगमेश्वर९६५६०राजापूर१०६७००नाटे२९५००लांजा११७७००देवरूख८१३००सावर्डे९३२२०चिपळूण१००५०३गुहागर९०२००अलोरे५३०५०खेड१००२०१दापोली२५००१मंडणगड३०७५१बाणकोट३१९२पुर्णगड५००१दाभोळ१२७९०एकूण१०४३६४१६बॉम्बशोध पथक, अग्निशमदलाचा बंबही तैनात ठेवण्यात आला होता. वाहतूक पोलिसांकडून देखील वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. केवळ गणपती नेणाऱ्या गाड्यांना किनाऱ्याकडे सोडण्यात येत होते. इतर गाड्यांना ऐंशी फूटी हायवेवर पार्किग देण्यात आले.