शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरच्या गंगातीर्थाचा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 14:16 IST

गंगातीर्थावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी भाविकांना गंगेच्या स्नानाची पर्वणी साधता येणार नसल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय- ९ महिन्यातच गंगेचे आगमन- विज्ञानालाही न सुटलेले कोड

राजापूर : ईश्वराचा साक्षात चमत्कार, विज्ञानाला मिळालेले आव्हान व मानवी बुध्दीला पडलेले कोडे असे सातत्याने वर्णन होत असलेल्या राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे १५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंगातीर्थाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना गंगास्नानाचा आनंद घेता येणार नाही.गतवर्षी २५ एप्रिलला गंगा अवतीर्ण झाली होती व त्यानंतर २४ जूनला ती अंतर्धान पावली होती. त्यावेळी तिचा कालखंड ६० दिवसांचा राहिला होता. निर्गमनानंतर नऊ महिन्यांनी गंगामाईचे आगमन झाले आहे. दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचे पाहावयास मिळत आहे.

यावेळीही ते दिसून आले. सकाळी स्थानिक गंगापूत्र व ग्रामस्थांकडुन गंगेच्या आगमनाचे वृत्त सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरले सोशल मीडियावरुन देखील गंगा आगमनाची बातमी पसरली. त्यामुळे भाविक मनोमनी सुखावला. मात्र, कोरोनाचे चालुन आलेले संकट व त्यापासून बचावासाठी उपाय योजना म्हणून सुरु असलेले लॉकडाऊन यामुळे घराबाहेर पडणे अशक्य असल्याने अनेकांना गंगास्नानाची पर्वणी साधता आली नाही.दरवर्षी पावसाळा समाप्त होताच उष्ण वारे वाहू लागले की, गंगेच्या आगमनाची शंका येते यापुर्वी अनेक वेळा तो अंदाज खरा ठरला आहे मात्र यावर्षी लांबलेल्या पावसाळ्यानंतर तसे काहीच घडले नव्हते तरीही त्या प्रथेला छेद देत गंगामाई अवतरली आहे. मात्र, कोरोनामुळे गंगातीर्थाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. गंगातीर्थावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी भाविकांना गंगेच्या स्नानाची पर्वणी साधता येणार नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण