शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इनाम जमीन भूसंपादनातील ५० टक्के मोबदला कुळांना मिळणार

By शोभना कांबळे | Updated: October 30, 2023 13:04 IST

भार्गवराम, परशुराम देवस्थान समितीला १० टक्के, प्रशासनाकडे ४० टक्के ठेवीचा निर्णय 

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील मौजे पेढे व परशुराम ही दोन गावे देवस्थान इनामातील असून, राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या रुंदीकरणामध्ये संपादीत झाली आहेत. जागेच्या एकूण मोबदल्यापैकी ५० टक्के मोबदला कुळांना, १० टक्के देवस्थान समितीला आणि उर्वरित ४० टक्क्यांचा मोबदला प्रशासनाच्या नावे ठेव ठेवण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.परशुराम गावातील विविध भूसंपादन मोबदला वाटप व जमीन हक्कसंदर्भात शनिवारी रात्री चिपळूण येथील रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीला आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी आमदार सदानंद चव्हाण उपस्थित होते. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी व कुळ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी सर्वांशी चर्चा करुन निर्णय जाहीर केला. उर्वरित रकमेची ठेव प्रशासनाच्या नावे ठेवण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.पालकमंत्री सामंत यांनी चिपळूण शहर विकास कामांसदर्भात आढावा बैठक घेतली. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी यावेळी सविस्तर आढावा दिला. ते म्हणाले की, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नुतनीकरणाचे अडीच कोटीचे काम पूर्ण झाले आहे. क्रीडा संकुल सिंथेटिक कोर्ट बनविणे तसेच सिंथेटिक कोर्टावरती विद्युतीकरण करणे प्रगतीपथावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याच्या सभोवती, भिंतीवर दगडी अच्छादन करणे व उर्वरित सुशोभिकरणाचे काम याबाबत आदेश देण्यात आला असून, १० नोव्हेंबरपासून कामास सुरुवात होणार आहे.

१४ घरे तिवऱ्यात, उर्वरित २६ घरे अलोऱ्यातचिपळूण तालुक्यातील तिवरे (भेंदवाडी) येथील धरणग्रस्त कुटुंबियांच्या घरासंदर्भातही बैठक झाली. या बैठकीत १४ घरे तिवरे येथे बांधायची, तर उरलेली १९ व पेढे परशुराम भूस्खलनातील ७ घरांचे पुनर्वसन अशी एकूण २६ घरे अलोरे येथे बांधण्याची सूचना पालकमंत्री सामंत यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. या बैठकीला तिवरे ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत