शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कोकणात शिवसेनेला धक्का, मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 18:49 IST

नगरपंचायत विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी दुजोरा दिला

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शहरातील शिवसैनिकांच्या शहर विकास आघाडीतील आठ लोकनियुक्त व एक स्वीकृत अशा ९ नगरसेवकांनी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आपण शिंदे गटात सहभागी होत असल्याचे जाहीर केले.

मुंबईत झालेल्या या भेटीबद्दल नगरपंचायत विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी दुजोरा दिला आहे. या भेटीसाठी गटनेते विनोद जाधव यांच्यासह नगरसेविका वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, सेजल गोवळे, योगेश जाधव, नीलेश सापटे, आदेश मर्चंडे, मुश्ताक दाभीळकर, स्वीकृत नगरसेवक प्रवीण जाधव यांच्यासह उपशहर प्रमुख नीलेश गोवळे, चेतन सातोपे, प्रतीक पोतनीस, विनीत रेगे, नरेश बैकर उपस्थित होते.शहर विकास आघाडीच्या नावाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या या आघाडीच्या हातातून सत्ता थोडक्यात निसटली. त्यामुळे अनुकूल जनमत असतानाही विरोधात बसावे लागलेले आहे. महाविकास आघाडी व शहर विकास आघाडी यांचे प्रत्येक आठ नगरसेवक निवडून आले हाेते. मात्र, चिठ्ठीच्या मदतीने निवडून आलेल्या नगरसेविकेने महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल दिल्याने शहर विकास आघाडी सत्तेपासून वंचित राहिली.

आमदार याेगेश कदम एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर त्यांचे समर्थकही शिंदे गटाच्या दिशेने चालू लागले आहेत. शहर विकास आघाडीने शिंदे गटाचे अधिकृतपणे समर्थन केले आहे. त्यातच महाविकास आघाडीतील विद्यमान सत्ताधाऱ्यांना आगामी कालखंडात राज्याकडून आपणास कोणतीही विशेष मदत होणार नसल्याची चुणूकही मिळाली आहे. शिंदे गटाचे समर्थन करून शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आपला राजकीय विजनवास संपुष्टात आणत सत्तेच्या दिशेने पाऊल टाकल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे