शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाला आला बहर, कोरोनामुळे आलेली मरगळ दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:46 IST

Christmas Tourisam Ratnagiri- नाताळच्या सुट्टीला जोडून शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टी आल्याने या सलग सुट्टीचा लाभ पर्यटकांना मिळणार आहे. सध्या हिवाळी पर्यटनाला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला असून, जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे गजबजली आहेत. समुद्रकिनारीही मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढू लागली आहे.

ठळक मुद्देनाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाला आला बहर, कोरोनामुळे आलेली मरगळ दूरथंडावलेल्या व्यवसायांंना गती येणार, समुद्रकिनाऱ्यांवर माणसांच्या लाटा

रत्नागिरी : नाताळच्या सुट्टीला जोडून शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टी आल्याने या सलग सुट्टीचा लाभ पर्यटकांना मिळणार आहे. सध्या हिवाळी पर्यटनाला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला असून, जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे गजबजली आहेत. समुद्रकिनारीही मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढू लागली आहे.गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही कोरोनाच्या भीतीमुळे लोक बाहेर पडण्यास घाबरत होते. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुनीसुनी वाटत होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पर्यटनासाठी लोक उत्सुक झाले आहेत. त्यातच पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांवरील बंदी उठली. त्यामुळे लोक पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत.जिल्ह्यातील समुद्रकिनारे आता पर्यटकांनी फुलून गेले आहेत. गणपतीपुळे येथे भाविक पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये, आरेवारे या समुद्रकिनाऱ्यांबरोबरच दापोली आणि गुहागरातील वेळणेश्वर येथेही पर्यटक वाढू लागले आहेत.शुक्रवारी नाताळची सुटी आहे. त्यालाच जोडून चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवसांची सुटी आल्याने बहुतांश शासकीय अधिकारी - कर्मचारी यांनीही या सुटीचा फायदा घेत पर्यटनाचा बेत आखला आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि २०२१ चे स्वागत करण्यासाठी गर्दीची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. 

 

राहण्यासाठी पर्यटन महामंडळाच्या निवासांना पर्यटक अधिक महत्त्व देत असल्याने गणपतीपुळे, वेळणेश्वर या ठिकाणी महामंडळाची निवासस्थाने ३ जानेवारीपर्यंत १०० टक्के भरलेली आहेत. त्याचबरोबर खासगी व्यावसायिकांच्या निवास, न्याहरी योजनेलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.- दीपक माने,कोकण विभाग पर्यटन अधिकारी,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (रत्नागिरी)

टॅग्स :Christmasनाताळtourismपर्यटनRatnagiriरत्नागिरी