शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम, चिपळुणात भाजी व्यावसायिकांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:26 IST

चिपळूण येथील नगर परिषद प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण व रस्त्यावर बसणाऱ्या भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजी व्यावसायिकांनी निषेधार्थ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचिपळुणात भाजी व्यावसायिकांचा बंदलाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या भाजी मंडई इमारतीची रचना चुकीच्या पद्धतीने निषेधार्थ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

चिपळूण : येथील नगर परिषद प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण व रस्त्यावर बसणाऱ्या भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजी व्यावसायिकांनी निषेधार्थ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत न्याय न मिळाल्यास भाजी व्यवसाय कायमस्वरुपी बंद ठेवण्यात येणार आहे. आज सकाळपासून व्यावसायिकांनी ठिय्या मांडला आहे.नगर परिषदेने गेली अनेक वर्षे भाजी व्यावसायिकांची दिशाभूल करुन अन्याय केला आहे. भाजी मंडईच्या पुढील बाजूला शॉपिंग मॉल व मागील बाजूस भाजी व्यावसायिकांना गाळ्यांची व्यवस्था केल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे, अशी महिती भाजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर शिंदे यांनी दिली.

शहरातील पूजा थिएटर येथे भाजी व्यावसायिकांची पत्रकार परिषद झाली. यावेळी श्रीरंग माजलेकर, प्रदीप आंब्रे, मारुती करंजकर, दत्तू वाळुंज, गणेश खंडझोडे, एकनाथ भालेकर, राजासाहेब तांबे, आरीफ बागवान यांच्यासह २५० ते ३०० भाजी विक्रेते उपस्थित होते.पूर्वीपासून भाजी व्यावसायिक येथे व्यवसाय करत आहेत. त्यांना हटविण्यात आल्यास त्यांनी करायचे काय? त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण होईल. अगोदर भाजी व्यापाऱ्यांना जागा देऊन त्यांची व्यवस्था करावी. १९७९ साली भाजी मंडईचे उद्घाटन झाले. त्यावेळी ३७ गाळे होते. १९८५मध्ये इंदिरा सुपर भाजी मंडई या नावाने दुसरी भाजी मंडई तयार करण्यात आली. तेव्हापासून भाजी मंडईच्या बाहेर त्यावेळी ५ रुपये प्रतिदिन जागा भाडे होते.

भाजी विक्रेत्यांची संख्या हळूहळू वाढली. नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या भाजी मंडई इमारतीची रचना चुकीच्या पद्धतीने केली आहे. ही भाजी मंडई नसून कोंबड्यांचा खुराडा आहे. सध्या भाजी मंडई गाळ्यांची लिलाव प्रक्रिया सुरु आहे. त्यातच सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम नगर परिषदेने हाती घेतली असून, या पार्श्वभूमीवर शहरातील बहादूरशेख नाक्यापासून ते मच्छीमार्केटपर्यंत असणाऱ्या भाजी व्यावसायिकांनी एकत्र येऊन दोन दिवस भाजी व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMarketबाजारMuncipal Corporationनगर पालिका