ठाणे स्टेशन बाजारपेठेतील भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांचा टिएमटीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 04:43 PM2018-02-05T16:43:39+5:302018-02-05T16:46:33+5:30

जांभळी नाका ते स्टेशन परिसरातील बाजारपेठेत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि समिती पुढे सरसावली आहे. परंतु या भागात आजही फेरीवाले बसत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Thane station hinders Timetty of vegetable vendors and ferries in the market | ठाणे स्टेशन बाजारपेठेतील भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांचा टिएमटीला अडथळा

ठाणे स्टेशन बाजारपेठेतील भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांचा टिएमटीला अडथळा

Next
ठळक मुद्देरविवारी पुन्हा सांयकाळी टिएमटीचा चक्काजाम कारवाई करुनही फेरीवाल्यांचे या भागात बस्तान

ठाणे - स्टेशन ते जांभळी नाका या भागातील फेरीवाल्यांना हटविल्यानंतर पहाटेच्या सुमारास बसणाऱ्या या रस्त्यांवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचा अडथळा आता टिएमटीच्या बसेसला होऊ लागला आहे. त्यामुळे या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि परिवहनच्या समिती सदस्यांनी शनिवारी पहाटे या भागात पाहणी दौरा घेऊन येथील भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई केली होती. परंतु रविवारी मात्र दुपार नंतर या भागात भाजी विक्रेत्यांबरोबरच फेरीवाल्यांनी दोन्ही बाजूंनी रस्ता अडविल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे स्टेशन ते जांभळीनाक्यापर्यंत टिएमटी बसेसच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते. त्यामुळे येथील कारवाई बाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
          ठाणे येथील जांभळी नाक्यापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत जाणाया मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर येथील फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम देखील जोरात राबविली होती. परंतु तरी देखील येथे फेरीवाल्यांचे वास्तव्य दिसून येत होते. त्यामुळे आळी पाळीने विविध अधिकारी आणि एस्ट्रा फोर्स घेऊन येथे कारवाई सुरु आहे. परंतु असे असले तरी देखील आजही या मार्गावरील फेरीवाल्यांची संख्या मात्र कमी झालेली दिसत नाही. त्यामुळे या फेरीवाल्यांचा आता टिएमटीच्या बसेसला देखील अडथळा निर्माण होऊ लागला आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या बाजारपेठ मार्गातून परिवहनच्या बसेस धावू लागल्या आहेत. परंतु सुरवातीला फेरीवाल्यांचे आणि आता पहाटे या बाजारपेठीत बसणाºया भाजी विक्रेत्यांचा फटका आता परिवहनच्या बसेसला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत या मार्गावर शहरातील छोटे विक्र ेते भाजी खरेदीसाठी येत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गावरून स्थानकाच्या दिशेने जाणाºया बसेसला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. ऐन सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला देखील याचा फटका बसत आहे. तसेच भाजी खरेदी करणाºया ग्राहकांना बसचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता भितीही व्यक्त होते. काँग्रेसचे परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत ठराविक वेळेत बस पुर्वीच्या मार्गाने वळविण्याची मागणी केली. मात्र, बसचा मार्ग वळविल्यास प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, या मागणीच्या पार्श्वभूमीवर परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी, सभापती अनिल भोर, सदस्य सचिन शिंदे आणि राजेंद्र महाडीक यांनी शनिवारी पहाटे बाजारपेठ मार्गाची पाहाणी केली. त्यानंतर बसचा विनाअडथळा आणि अपघातमुक्त प्रवास व्हावा यासाठी पालिकेच्या अतिक्र मण पथकाची मदत घेण्याचा विचार प्रशासनाने सुरु केला आहे. बाजारपेठ मार्गावर पहाटे ते सकाळपर्यंत भाजी विक्र ेते बसत असल्यामुळे या काळात येथे अतिक्र मण पथकाचे एक वाहन ठेवायचे आणि भाजी विक्र ेत्यांचा बसच्या वाहतूकीला अडथळा होणार नाही, याकडे पथकाने लक्ष द्याायचे, अशी योजना प्रशासनाकडून आखली जात असल्याचे महापालिका सुत्रांनी सांगितले.
                दरम्यान, पहाटेचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देखील या भागातील फेरीवाल्यांची संख्या मात्र आजही कमी झालेली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रविवारी फेरीवाले बसल्याचे दिसून आले. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांच्या बाहेर दुचाकींची पार्कींग झाली होती. त्यामुळे जांभळी नाका ते स्टेशन पर्यंतच्या अवघ्या ३ मिनिटांच्या अंतरांसाठी टिएमटीच्या बसेसला तब्बल १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत होता. त्यामुळे पालिकेचे अतिक्रमण विभाग कारवाई करते की या फेरीवाल्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे. असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.



 

Web Title: Thane station hinders Timetty of vegetable vendors and ferries in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.