शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणचे अपूर्व शारंगपाणी बनले भारतीय सैन्य दलात कर्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:02 IST

Indian Army, ratnagirinews, chiplun चिपळूणचा सुपुत्र अपूर्व शारंगपाणी यांना भारतीय सैन्य दलात कर्नल पदावर बढती मिळाली आहे. शहरातील निवृत्त वायुसेना अधिकारी हेमंत भागवत यांच्यानंतर सैन्यदलात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळणारे शारंगपाणी दुसरे सैनिक आहेत. यापूर्वी लेफ्टनंट कर्नल असताना दक्षिण सुदानमधील कामगिरीबद्दल त्यांना युएन पदकाने गौरविण्यात आले होते.

ठळक मुद्देचिपळूणचे अपूर्व शारंगपाणी बनले भारतीय सैन्य दलात कर्नलयुएन पदक, दक्षिण सुदानमधील कामगिरीबद्दल केला होता गौरव

चिपळूण : चिपळूणचा सुपुत्र अपूर्व शारंगपाणी यांना भारतीय सैन्य दलात कर्नल पदावर बढती मिळाली आहे. शहरातील निवृत्त वायुसेना अधिकारी हेमंत भागवत यांच्यानंतर सैन्यदलात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळणारे शारंगपाणी दुसरे सैनिक आहेत. यापूर्वी लेफ्टनंट कर्नल असताना दक्षिण सुदानमधील कामगिरीबद्दल त्यांना युएन पदकाने गौरविण्यात आले होते.येथील नेत्र शल्य विशारद कै. डॉ. संजीव शारंगपाणी आणि अंजली शारंगपाणी यांचे सुपुत्र अपूर्व शारंगपाणी यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण चिपळुणात झाले. त्यानंतर एनडीएची प्रवेश परीक्षा देऊन त्यांनी डेहराडून येथील इंडियन मिलेट्री अकादमीमध्ये प्रवेश घेतला.

सिकंदराबाद येथील आर्मिच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून ते मिलेट्री अभियंता बनले. नंतर पदव्युत्तर विशेष अभ्यासक्रमही पूर्ण केला. भारतीय सैन्यदलात कार्यरत असताना कुपवाडा, बारामुल्ला, लडाख, कारगिर, राजस्थान बॉर्डर, चंदीगड, झाशी, जोधपूर, बडोदा, अहमदाबाद आदी ठिकाणी ते लष्करी सेवत होते. वेलिंग्टन येथून त्यांनी विशेष लष्करी अधिकारी हे प्रशिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर त्यांना युनोच्या शांतीसेनेत काम करण्याची संधी मिळाली.दक्षिण सुदानमध्ये युनायटेड नेशनतर्फे शांतता प्रस्थापित करणे आणि तेथील नागरिकांना संरक्षण देण्याचा उपक्रमात विविध देशांमधील सैनिकांसोबत भारतीय सैन्यदलातील १५ सैनिक सहभागी झाले होते. तेथील बोर अभयारण्यात सुमारे २५०० सुदानी नागरिकांना संरक्षण देण्याचे काम लेफ्टनंट कर्नल अपूर्व शारंगपाणी यांच्या टिमवर सोपविण्यात आले होते. तेथील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल लेफ्टनंट कर्नल अपूर्व शारंगपाणी आणि त्यांच्या सोबत असलेल्या १४ भारतीय सैनिकांना युएन पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

जनरल फ्रँक मुशो कामान्झी यांनी हा प्रतिष्ठेचा शांतता पुरस्कार देऊन गौरविले. त्यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी गव्हर्नर अ‍ॅगोट अ‍ॅलियर यांनी भारतीय सैनिकांचे विशेष कौतुक केले. यावेळी भारताचे दक्षिण सुदानमधील राजदूर श्रीकुमार मेनन उपस्थित होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानRatnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण