शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुळ्यांच्या गंमतीशीर विश्वात चिपळूणकर रमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:05 IST

हे दोघेही एकाच वर्गात शिकले. त्यामुळे शाळेत नेहमी त्यांना करण-अर्जुन या नावानेच संबोधले जायचे. मात्र, त्यातील करण कोण व अर्जुन कोण, हा फरक ओळखता येत नसे. त्यांच्यात इतके साम्य आहे की, मोबाईलवर फोटो ओळखपत्र देतानादेखील दोघांचा चेहरा एकमेकांना लागू होतो.

ठळक मुद्दे- चिपळुणात जुळ्यांचे संमेलन- मातृत्वाला गिफ्ट मिळाल्याची अनेक पालकांची भावना - अचंबित करणाऱ्या गोष्टी

चिपळूण : कधी सावळा आणि गोरा रंग, कधी उंचीतील फरक तर कधी दोघांमधील तंतोतंत असलेले साम्य चिपळूणवासियांना रविवारी जुळ्यांच्या संमेलनात अनुभवायास मिळाले. एवढेच नव्हे तर त्यांच्या जीवनातील गंमतीशीर घटना, प्रसंग व त्यांच्या अनोख्या स्वभावाविषयी अनेकांना कुतुहल वाटले.चिपळूण रोटरी क्लबतर्फे प्रथमच अशा पध्दतीचा उपक्रम चिपळुणात झाल्याने त्याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्याप्रमाणे ३०हून अधिक जुळ्यांनी या संमेलनात सहभाग घेतला. त्यातील करण-अर्जुन कांबळे यांच्या विश्वातील गंमतीशीर गोष्टीने अनेकजण अचंबित झाले. हे दोघेही एकाच वर्गात शिकले. त्यामुळे शाळेत नेहमी त्यांना करण-अर्जुन या नावानेच संबोधले जायचे. मात्र, त्यातील करण कोण व अर्जुन कोण, हा फरक ओळखता येत नसे. त्यांच्यात इतके साम्य आहे की, मोबाईलवर फोटो ओळखपत्र देतानादेखील दोघांचा चेहरा एकमेकांना लागू होतो.तसेच रिध्दी-सिध्दी काटकर या दोन मुलींमधील साम्यदेखील चक्क आई-वडिलांना चकीत करुन सोडते. ह्यसीता और गीताह्ण या चित्रपटातील व्यक्तीरेखेप्रमाणे रिध्दी व सिध्दी यांच्यातदेखील कडक व मृदू स्वभाव हाच त्यांच्यात फरक असल्याचे आई-वडिलांनी सांगितले. याशिवाय जाई-जुई चिंगळे, आभास-अध्याय थरवळ, अजय-विजय जाडे, परेश-पंकज तांबट व ६३ वर्षांच्या चित्रा कानडे व स्नेहलता शेवडे यांच्यातील साम्य सर्वांनाच चकीत करणारे होते. चित्रा व स्नेहलता यांच्यात लाल व काळ्या टिकलीद्वारे फरक आढळून येतो. त्यावरुन लोक त्यांना ओळखतात.तिळ्यांचे ठरले आकर्षणया संमेलनात नंदन-विजय-भूषण भास्कर कदम हे तिळे सहभागी झाले होते. तिघांचे उच्चशिक्षण झाले असून, त्यांच्या सवयी व स्वभावातही तितकेच साम्य आहे. तिळे म्हणून अनेकजण त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहत असतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRotary Clubरोटरी क्लब