शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण भाजी मंडईचा गुंता अखेर सुटला, दहा वर्षे इमारत होती पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 15:05 IST

Chiplun Market Ratnagiri- चिपळूण येथील महर्षी कर्वे भाजी मंडईची नवीन इमारत दहा वर्षे पडून होती. आधी मूल्यांकनाअभावी व नंतर वाढीव दराच्या मूल्यांकनामुळे वाद निर्माण झाल्याने लिलाव प्रक्रिया लांबली होती. मात्र, आता त्रिसदस्यीय समितीने नव्याने सादर केलेल्या मूल्यांकनात दर घटल्याने हा गुंता सुटण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देचिपळूण भाजी मंडईचा गुंता अखेर सुटला, दहा वर्षे इमारत होती पडूनव्यापाऱ्यांनी आठवेळा नाकारली लिलाव प्रक्रिया

चिपळूण : येथील महर्षी कर्वे भाजी मंडईची नवीन इमारत दहा वर्षे पडून होती. आधी मूल्यांकनाअभावी व नंतर वाढीव दराच्या मूल्यांकनामुळे वाद निर्माण झाल्याने लिलाव प्रक्रिया लांबली होती. मात्र, आता त्रिसदस्यीय समितीने नव्याने सादर केलेल्या मूल्यांकनात दर घटल्याने हा गुंता सुटण्यास मदत होणार आहे.साधारण २००६मध्ये भाजी मंडईची जुनी इमारत पाडण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला. या निर्णयानंतर व्यापाऱ्यांची पर्यायी व्यवस्था व नवीन इमारतीचा आराखडा हे दोन्ही विषय तितकेच वादग्रस्त ठरले. तत्कालीन नगराध्यक्षा हेमलता बुरटे यांनी व्यापाऱ्यांच्या विरोधानंतरही इमारत तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून निर्माण झालेला वाद विकोपाला गेला होता. अखेर न्यायालयाने नगर परिषदच्या बाजूने निर्णय दिला आणि या कामाला वेग आला. त्यानंतर काही वर्षांतच या इमारतीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर केवळ मूल्यांकनाच्या नावाखाली सहा वर्षे वाया गेली.चार वर्षांपूर्वी या इमारतीचे मूल्यांकन झाले, परंतु ते दर भाजी व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांना न परवडणारे होते. १०० चौरस फुटाच्या गाळ्यासाठी ६,५०० रुपये भाडे व ६ लाख रुपये ना परतावा अनामत रक्कम आणि त्यावर ८ टक्के व्याज भरावे लागणार होते. त्यामुळे या मूल्यांकनाला सुरुवातीपासूनच विरोध झाला.

५४ गाळे व ५२ ओटे लिलावासाठी आतापर्यंत आठवेळा निविदा काढण्यात आली. परंतु, अवास्तव दरामुळे एकदाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नगर परिषदने मूल्यांकनावर फेरविचार करण्याची मागणी केली. त्यानुसार आता दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Chiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदMarketबाजारRatnagiriरत्नागिरी