शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

'आपत्ती व्यवस्थापन'साठी चिपळूणचे 'जलतरणपटू' सरसावले!, पात्रता निवड चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 16:28 IST

चिपळूण : पावसाळ्यात २२ जुलै २०२१ सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास अथवा अन्य आपत्ती ओढावल्यास त्याला कसे तोंड द्यावे, याबाबत ...

चिपळूण : पावसाळ्यात २२ जुलै २०२१ सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास अथवा अन्य आपत्ती ओढावल्यास त्याला कसे तोंड द्यावे, याबाबत येथील नगर परिषद प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या आपत्तीविरोधात लढण्यासाठी मदत कार्यासाठी धावणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांची पात्रता निवड चाचणी आज, शनिवारी झाली. यामध्ये ३७ जलतरणपटूंनी ही चाचणी शहरातील गांधारेश्‍वर मंदिराच्या डोहात पूर्ण केल्याने त्यांची प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली आहे.गतवर्षी २२ जुलैच्या महापुराने चिपळूण शहरात एकच हाहाकार उडाला होता. बचाव कार्य वेळेत न झाल्याने मोठी मनुष्य व वित्तहानी झाली. त्यानंतर येथील प्रशासनासह नगर पालिका व्यवस्थापन नागरिकांच्या टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे, वेळीच मदत कार्य कसे पोहोचविता येईल व होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी चिपळूण नगर परिषद आतापासूनच अलर्ट झाली आहे. नगर परिषद प्रशासनाने पावसाळी पूरपरिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे येथील अस्तीत्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे.या संस्थेमार्फत आपत्कालीन बचाव कार्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण १३ ते १५ मे दरम्यान सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे, व्यापारी, राजकीय पक्ष यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.या प्रशिक्षणापूर्वी त्यात सहभाग घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींची पात्रता निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी वाशीष्टी नदीपात्राच्या मध्यवर्ती भागात जाऊन परत काठावर येणाऱ्या तरुणांची या प्रशिक्षणासाठी निवड केली. पुणे येथील अस्तीत्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भूषण देशपांडे यांनी संबंधित तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, नगर अभियंता परेश पवार, वैभव निवाते, राजू खातू, महेश शिंदे, बाळकृष्ण पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.शिबिरात काय शिकायला मिळणारया शिबिरात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींमधून पोहोता येणारे व पोहोता न येणारे असे दोन गट तयार केले जाणार आहेत. तसेच या शिबिरात पूर आपत्तीला कसं तोंड द्यावे, त्याची तयारी कशी करावी, स्वत:चा जीव व दुसऱ्याचा जीव कसा वाचवावा, लाईफ सेव्हिंग इक्वीपमेंटचा वापर कसा करावा, वित्तहानी कशी टाळावी आदींबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूरchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढा