शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: चिपळूण नगर परिषद ठरली सर्वाधिक स्वच्छ; देशपातळीवर ८७ वे तर कोकणात अव्वल मानांकन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:05 IST

नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसादही चिपळूणचे मानांकन वाढविण्यासाठी मोलाचा ठरला

चिपळूण : केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानामध्ये देशभरातील ४,५८९ नगर पंचायती, नगर परिषदा व महानगरपालिकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये चिपळूण नगर परिषदेला ५० हजार ते ३ लाख लोकसंखेच्या वर्गवारीमध्ये देशपातळीवर ८७ वे, महाराष्ट्रात १४ वे, तर कोकण विभागात पहिले मानांकन मिळाले आहे.चिपळूण नगर परिषदेकडे उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्रीद्वारे दररोज कचऱ्याचे १०० टक्के संकलन, वर्गीकरण तसेच ओला, सुका व घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया, मैला संकलन व त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता, शहर सफाई इत्यादी कामे नगर परिषदेमार्फत करण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत चिपळूण नगर परिषदेने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीही करण्यात आली होती. केंद्र शासनामार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेमार्फत शहराची स्वच्छतेची व कचरा प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. नागरिकांच्या स्वच्छतेबाबत प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार कचरामुक्त शहराचे तारांकित मानांकन म्हणून १ स्टार व हागणदारी मुक्त शहर म्हणून ओडीएफ मानांकनही नगर परिषदेला मिळाले आहे. नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसादही चिपळूणचे मानांकन वाढविण्यासाठी मोलाचा ठरला आहे.मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, शहर समन्वयक पूजा शिंत्रे, आरोग्य विभाग कार्यालय कर्मचारी, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, तसेच सर्व मुकादम, सर्व स्वच्छतादूत तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्वच्छतादूत, शहरातील सर्व नागरिकांच्या सहभागातून चिपळूण शहराला हे मानांकन मिळाले आहे.