शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

चिपळूण -गोवळकोट पूल अखेर होणार सुरु?

By admin | Updated: September 17, 2014 22:27 IST

बहुचर्चित प्रश्नावर तोडगा

चिपळूण : बहुचर्चित ठरलेला व अनेक अडचणींतून प्रवास करणारा चिपळूण शहरातील गोवळकोट -कालुस्ते हा महत्त्वाचा पूल अखेर उद्घटनापूर्वीच तात्पुरत्या स्वरुपात येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने सुरु झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचे काम सुरु होते. भूसंपादनापासून ते अनेकांच्या विरोधातून अखेर चाळीस वर्षे प्रतीक्षेत असलेला हा वाशिष्ठी व गोवळकोट खाडी यांना तसेच अनेक गावांना जोडणारा पूल पूर्णत्त्वाकडे गेला आहे. अजूनही काही अंतिम टप्प्यातील काम बाकी असतानाच येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या पुलावरून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. गुरुवार, शुक्रवारपासून या पुलावरून काहींनी वाहने नेऊन धन्यता मानली.मुळातच, हा पूल युतीच्या कारकिर्दीत मंजूर झाला होता. मात्र, काही तांत्रिक व भूसंपादनाच्या अडचणींमुळे त्याचे काम रखडले होते. यानंतर सर्व पक्षातील नेत्यांनी केलेला पाठपुरावा आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून अखेर हा पूल पूर्णत्त्वाकडे जाण्यास २०१४ साल उजाडले. अर्थसंकल्पीय निधीतून हा पूल झाला आहे.शुक्रवारी येथे काहींनी एकमेकांना शुभेच्छा देऊन उत्साहाच्या अनौपचारकिरित्या या पुलावरून वाहने नेण्याचा शुभारंभ केला. मात्र, या पुलाचे अद्याप उद्घाटन केले नसल्याचे किंवा वाहतुकीस खुला झाला नसल्याचे अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात आले. केवळ काम पूर्णत्त्वाकडे आले आहे. आचारसंहिता असल्याने या पुलाचे काम झाल्याचे अद्याप जाहीर करता येत नसल्याची माहितीदेखील यावेळी देण्यात आली. योग्यवेळी याविषयी वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी निर्णय घेऊन या पुलाविषयी माहिती स्पष्ट करतील, असेही सांगण्यात आले. हा पूल आता रहदारीस खुला होणार असल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. (प्रतिनिधी)अनेक विकासकामे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या उद्घाटनाअभावी त्याचा वापरही केला जात नाही. मात्र, एखाद्या कामाचे उद्घाटन झाले, तर त्याचा श्रेयवाद मात्र उफाळून येतो. मग त्या कामाचे दोन-तीनदाही उद्घाटन होते. चिपळुणातील या पुलाबाबतही दुर्लक्ष झाल्याने उद्घाटन लांबले आहे. मात्र, एका पक्षाने त्याचे उद्घाटन केल्यावर त्याचाही श्रेयवाद सुरू होईल, अशी चर्चा सुरू आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पुलाचे काम सुरु.अंतिम टप्प्यातील काम बाकी असतानाच येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या पुलावरून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला सुरु.युतीच्या काळात मिळाली मंजुरी, पूल पूर्णत्त्वास जाण्यास उजाडले २०१४ साल.अर्थसंकल्पीय निधीतून पूल पूर्णत्त्वास.उद्घाटनाची प्रतीक्षाच.