शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

चिपळुणात ७० सदनिकांनी सोसायटी कचरामुक्त केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 19:36 IST

Garbage Disposal Issue Ratnagiri- चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने शहरातील किरणविहार संकुल या सोसायटीतील ७० सदनिकांमध्ये गतवर्षीपासून कचरामुक्त उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाला मोठे यश आले असून, आता शहरातील दहा गृहनिर्माण सोसायटींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कचरामुक्त सदनिकाधारकांना नगर परिषदेकडून घरपट्टीत ५ टक्के सूट दिली जात आहे.

ठळक मुद्देचिपळुणात ७० सदनिकांनी सोसायटी कचरामुक्त केली नगर परिषदेने घरपट्टीत पाच टक्के सवलत दिली

 संदीप बांद्रेचिपळूण : येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने शहरातील किरणविहार संकुल या सोसायटीतील ७० सदनिकांमध्ये गतवर्षीपासून कचरामुक्त उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाला मोठे यश आले असून, आता शहरातील दहा गृहनिर्माण सोसायटींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कचरामुक्त सदनिकाधारकांना नगर परिषदेकडून घरपट्टीत ५ टक्के सूट दिली जात आहे.यावर्षी संस्थेने या उपक्रमाचा विस्तार म्हणून चिपळूणमधील प्रथम येणाऱ्या दहा सोसायट्या तसेच १०० लहान-मोठी कुटुंबे कचरामुक्त करण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे. हा प्रकल्प डाऊ केमिकल इंटरनॅशनल व सह्याद्री निसर्ग मित्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून व चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने होणार आहे.

या दहा सोसायट्यांमधून ओला कचरा व सुका कचरा घरातच वेगवेगळा करून स्वतंत्रपणे दिला जाणार आहे. सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्याचे उत्तम खत बनवले जाईल व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून तो रिसायकलिंगकरिता पाठवला जाईल. यासाठी लागणारी साधनसामुग्री प्रोत्साहनार्थ पुरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या प्रकल्पात पुढे कायमस्वरूपी तांत्रिक मदत पुरविण्यात येणार आहे. ज्या सोसायट्या व घरे हे व्यवस्थापन यशस्वी करतील, त्यांना घरपट्टीमध्ये पाच टक्के सूट मिळणार आहे. गतवर्षी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने चिपळूण नगर परिषदेच्या मार्गदर्शनाखाली किरणविहार संकुल ही ७० सदनिकांची सोसायटी यशस्वीपणे कचरामुक्त केली व त्यातील सदनिकाधारकांना पालिकेने घरपट्टीमध्ये सूटही दिली आहे.

भारतात दरवर्षी ९३ लाख टन कचरा तयार होतो. प्रत्येक माणूस दिवसाला ०.१४ ते ०.६४ ग्राम कचरा तयार करतो. या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने कचरा ही राष्ट्रीय समस्या बनली आहे. आपल्या परिने अल्प प्रमाणात का होईना ही समस्या सोडविण्याचा सह्याद्री निसर्ग मित्र प्रयत्न करत आहे. यासाठी जनजागृतीपर माहितीपट बनविण्यात येणार असून, हा माहितीपट संपूर्ण चिपळूणमध्ये दाखवला जाणार आहे.ॲपचीही घेतली मदतया कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, अँड्रॉईड ॲप बनवले जाणार आहे. यातून रियल टाईम डाटा मॅनेजमेंट केली जाणार आहे. जनजागृतीसाठी या ॲपचा वापर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून कचरामुक्तीचे महत्त्व सांगितले जाणार आहे.'क्लीन होम मिनिस्टर'ची निवडया कार्यक्रमातून संपूर्ण चिपळूणमध्ये स्वच्छ गृहमंत्री (क्लीन होम मिनिस्टर) स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कामात व्यक्ती, संस्था, युवकांना सहभागी केले जाणार आहे. कचरामुक्त सोसायटी व घर प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सोसायटी पदाधिकारी व नागरिकांनी संस्थेकडे आपली नोंदणी करावी. याकरिता उदय पंडित, भाऊ काटदरे, राम मोने यांच्याशी संपर्क साधावा.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नRatnagiriरत्नागिरीChiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषद