शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर येथे खंडपीठ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांची शिष्टाई, रत्नागिरीतील कार्यक्रमात दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 18:25 IST

रत्नागिरी : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, ही मागणीचे निवेदन कृती समितीत समावेश असलेल्या रत्नागिरी बार असोसिएशनच्या ...

रत्नागिरी : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, ही मागणीचे निवेदन कृती समितीत समावेश असलेल्या रत्नागिरी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रत्नागिरी दाैऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. यावेळी शिंदे यांनी आपण मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन चर्चा केली आहे. संयुक्त बैठकीसाठीही त्यांच्याकडे वेळ मागितली आहे. खंडपीठासंदर्भात शासन सकारात्मक असून विषय मार्गी लागेल, अशी ग्वाहीही त्यांनी या शिष्टमंडळाला दिली.रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील ४७०० वकील, साठ हजार खटले व त्यातील हजारो पक्षकार यांच्याशी खंडपीठाचा विषय निगडित आहे. गेली सुमारे ३८ वर्षे कोल्हापूर खंडपीठासाठी लढा सुरू आहे. कोल्हापूर येथे खंडपीठ झाल्यास या सहाही जिल्ह्यांना सोयीचे होणार आहे. त्यामुळे ही मागणी सातत्याने करण्यात येत आहे. येथील लोकनेते श्यामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी बुधवार, दि. २१ रोजी मुख्यमंत्री शिंदे रत्नागिरीत आले असता या कार्यक्रमापूर्वी त्यांना कृती समितीच्या शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.या शिष्टमंडळात रत्नागिरी बारचे अध्यक्ष व कृती समितीचे सदस्य अॅड. विलास पाटणे, अॅड. अशोक कदम, अॅड. विजय साखळकर, उपाध्यक्ष अॅड. शाल्मली आबुलकर, सचिव अॅड. रत्नदीप चाचले यांचा समावेश होता. या निवेदनात या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाचे त्या कामी सहकार्य वेळोवेळी लाभले असल्याचे नमूद केले आहे. तथापी, हा विषय अंतिमतः मार्गी लागण्यासाठी आपण देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांच्याशी संपर्क साधून संयुक्त सभा बोलवावी, ही विनंती करण्यात आली आहे. तसेच अंतिमतः पक्षकारांच्या न्यायासाठी असल्याने मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागेल, अशी अपेक्षा कृती समितीतर्फे करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण मुख्य न्यायाधीशांशी याबाबत चर्चा करून एकत्रित बैठकीची वेळ मागितली असल्याचे सांगितले. खंडपीठसंदर्भात शासन सकारात्मक असून विषय मार्गी लागेल, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेadvocateवकिल