शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणच्या हद्दीत लवकरच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:40 IST

चिपळुण नगरपरिषदेत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी शासनाच्या कला संचालनालयाने मंजुरी दिली असून पुतळा उभारण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामी येणारा १ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर हे करणार आहेत.

ठळक मुद्देशिवपुतळ्याला कला संचालनालयाची परवानगी, खर्च पालकमंत्री करणारपुतळा उभारण्यासाठी १ कोटींपेक्षा जास्त खर्च

रत्नागिरी : लोकप्रतिनिधी तसेच जनतेच्या मागणीनुसार चिपळुण नगरपरिषदेत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या कला संचालनालयाने याला मंजुरी दिली असून पुतळा उभारण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून या कामी सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार असून पुतळ्याचा खर्च रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर हे स्वत: करणार आहेत.चिपळूण नगरपरिषदेच्या हद्दीत स्वमालकीच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक जनतेकडून करण्यात येत होती. त्यानुसार चिपळुण नगरपरिषदेच्या दिनांक १० सप्टेंबर २०१८ च्या मुख्य सभेत (ठराव क्रमांक ६७) याबाबतचा ठराव पारीत करण्यात आला.

हा पुतळा उभारणेकामी होणाऱ्या खर्चास नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय व आर्थिक मंजुरीही देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी देखील नगरपरिषदेने ठरावाद्वारे घेतली आहे. परंतु पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाच्या काला संचालनालयाकडून आवश्यक ती परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने पुतळा उभारण्याचे कामही रखडले होते.याप्रश्नी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी कला संचालक मिश्रा यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीनंतर कला संचालनालयाने १५ जानेवारी रोजी पुतळा उभारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चिपळुण नगरपरिषदेत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून फेबु्रवारीच्या अंतिम आठवडयात पुतळा उभारण्याचे काम पुर्ण करण्यात येणार आहे.

हा पुतळा पालकमंत्री स्वखर्चाने उभारणणार असून, पुतळ्यासाठी आवश्यक चौथरा तसेच सभोवतालील सुशोभिकरण व अन्य कामांसाठी सुमारे रुपये १ कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात येणार असल्याची माहितीपालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRatnagiriरत्नागिरीRavindra Vaikarरवींद्र वायकर