शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आवाशीत महामार्गावर रासायनिक सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:14 IST

अज्ञात वाहनाच्या मदतीने व स्थानिकांच्या सहकार्याने गेले दोन दिवस आवाशी येथील महामार्गालगत नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जात आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराचा एमपीसीबीने छडा लावावा, यासाठी लेखी तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआवाशीत महामार्गावर रासायनिक सांडपाणी कंपनीवर योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन

आवाशी : अज्ञात वाहनाच्या मदतीने व स्थानिकांच्या सहकार्याने गेले दोन दिवस आवाशी येथील महामार्गालगत नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जात आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराचा एमपीसीबीने छडा लावावा, यासाठी लेखी तक्रार करण्यात आली आहे.मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर आवाशी येथे असणाऱ्या पेट्रोलपंपाच्या पुढे गेले दोन दिवस अज्ञात वाहनाच्या मदतीने लोटे औद्योगिक वसाहतीत कंपनीचे रासायनिक सांडपाणी महामार्गालगतच नाल्यात सोडले जात असल्याचा प्रकार गावातील अमित आंब्रे व त्याच्या सहकाऱ्यांच्या नजरेस आला. या घटनेची माहिती अमित अशोक आंब्रे यांनी एमपीसीबीला दिली. त्यानुसार बुधवारी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मात्र, गुरुवारी दुसऱ्या दिवशीही तसाच प्रकार त्याच ठिकाणी घडला आहे.रासायनिक सांडपाणी हे निळ्या व हिरव्या रंगाचे असल्याने रंग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर स्थानिकांतून संशय व्यक्त केला जात आहे. एमपीसीबीने घटनास्थळी भेट देऊन कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार देण्याचे तरुणांना आवाहन केले. त्यानुसार अमित आंब्रे यांनी एमपीसीबीला लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. हे गैरकृत्य करणाऱ्याचा शोध घेऊन संबंधित कंपनीवर योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी मात्र याबाबत संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरीenvironmentपर्यावरण