रत्नागिरी : आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात येते. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांसाठी मिळालेल्या एकूण १० कोटी रूपयांच्या निधीपैकी मार्च २०१४ अखेर ८ कोटी ४५ लाख ८५ हजार इतका खर्च झाला आहे. सर्वाधिक खर्च चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांचा १ कोटी ९० लाख इतका झाला असून, सर्वांत कमी राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा १ कोटी ४२ लाख रूपये इतका झाला आहे.स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून वितरीत केला जातो. यात प्रत्येक मतदार संघातील रस्ते दुरूस्ती, डांबरीकरण व खडीकरण, वर्गखोल्या, पाखाडी बांधणे, पुलांंची दुरूस्ती, समाज मंदिर बांधणे, व्यायामशाळा आदी विकास कार्यक्रमांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सन २०१३ - १४ या आर्थिक वर्षासाठी पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण १० कोटी निधी प्राप्त झाला. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात मार्च २०१४ अखेर सर्वाधिक एकूण खर्च चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांचा १ कोटी ९० लाख रूपये इतका झाला आहे.त्याखालोखाल रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, आणि दापोलीचे आमदार सूर्यकांत दळवी यांचा (अनुक्रमे १ कोटी ८७ लाख आणि १ कोटी ८१ लाख रूपये) झाला आहे. या तुलनेने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा (१ कोटी ४४ लाख) आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा (१ कोटी ४२ लाख रूपये) निधी कमी खर्च झालेला दिसून येतो. या पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण मिळालेल्या १० कोटीच्या निधीमधून गतवर्षातील (सन २०१२-१३) अपूर्ण कामासाठी ३ कोटी ३६ लाख २९ हजार इतका निधी वितरीत करण्यात आला होता. २०१३-१४ या आर्थिक वर्षातील नवीन कामासाठी ९ कोटी ९१ लाख ५८ हजार इतका निधी उपलब्ध होता. मार्च १४ अखेर ९ कोटी ९१ लाख ३३ हजार एवढ्या किमतीच्या ३३० नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. एकंदरीत २०१३ - १४ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला देण्यात आलेल्या एकूण १० कोटी निधीपैकी ८ कोटी ४५ लाख ८५ हजार इतका खर्च झाला आहे. उर्वरित १ कोटी ५४ लाख १५ हजाराचा निधी ३१ मार्च २०१४ अखेर कार्यान्वयन यंत्रणेकडे देण्यात आला आहे. त्यामुळे मार्च २०१४ अखेर अपूर्ण राहिलेल्या कामासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील विकासकामांसाठी २०१३- १४ साठी प्रत्येकी दोन कोटीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी मार्च २०१४ अखेर झालेला खर्चमतदारसंघआमदारझालेला खर्च१) दापोलीसूर्यकांत दळवी१,८१,२०,०००२) गुहागरभास्कर जाधव१,४४,०६,०००३) चिपळूणसदानंद चव्हाण१,९०,१६,०००४) रत्नागिरीउदय सामंत१,८७,५८,०००५) राजापूरराजन साळवी१,४२,८५,०००एकूण८,४५,८५,०००
निधी खर्च करण्यात चव्हाण आघाडीवर, साळवी पिछाडीवर
By admin | Updated: July 23, 2014 22:29 IST