रत्नागिरीतील चार व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:20+5:302021-05-08T04:32:20+5:30

रत्नागिरी : प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्‍लंघन करत आपली दुकाने सकाळी ११ नंतरही सुरू ठेवल्याप्रकरणी रत्नागिरी शहरातील चार व्यापाऱ्यांविराेधात ...

Charges filed against four traders in Ratnagiri | रत्नागिरीतील चार व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

रत्नागिरीतील चार व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next

रत्नागिरी : प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्‍लंघन करत आपली दुकाने सकाळी ११ नंतरही सुरू ठेवल्याप्रकरणी रत्नागिरी शहरातील चार व्यापाऱ्यांविराेधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी १२.४५ ते १.१५ वाजेच्या दरम्यान करण्यात आली.

उमिद ट्रेडर्स दुकानाचे व्यवस्थापक सोहेल महंमद रफिक बावानी, तुलसी अमृततुल्य चहा दुकानाचे व्यवस्थापक समीर भानुदास नेवगी, हॉटेल परंपराचे व्यवस्थापक श्रीराम शिरीष मुळ्ये आणि गाडीतळ येथील समर्थ भांडारचे व्यवस्थापक ऋषिकेश जयंत पटवर्धन अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी कोरोनाचा संसर्ग होईल हे माहिती असूनही आपली दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू ठेवली हाेती. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या पथकाने केली.

Web Title: Charges filed against four traders in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.