रत्नागिरी : शहरातील साळवीस्टॉप येथील नगर परिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्राचे भंगार चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची ही घटना १५ मार्च रोजी रात्री ९ ते १६ मार्च रोजी सकाळी ६ वाजण्याच्या कालावधीत घडली आहे. विशाल श्रावण चव्हाण (२०, साळवीस्टॉप, रत्नागिरी) आणि अन्य एकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात वैदेही विनोद चव्हाण (रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
१५ मार्च ते १६ मार्च या कालावधीत विशाल आणि त्याच्या सहकाऱ्याने जलशुध्दीकरण केंद्राचे भंगार सामान रिक्षामधून चोरुन नेले. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.