दाभाेळ : दापाेली तालुक्यातील काेलथरे - भंडारवाडा येथे आढळलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. हा मृतदेह दिनांक ७ सप्टेंबर रोजी आढळला असून, ताे कुजलेल्या स्थितीत असल्याने ओळख पटविण्याचे आव्हान पाेलिसांसमाेर आहे.
दापाेली तालुक्यातील कोलथरे गावातील भंडारवाडा शेजारी २०० मीटर अंतरावर वाळूवर समुद्राच्या लाटेसोबत आलेला एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या व फुगलेल्या अवस्थेत आढळला. त्याचे वय अंदाजे ३५ ते ४५ असल्याचे पाेलिसांनी सांगितले. याबाबतची माहिती कोलथरे पोलीस पाटील यांनी दाभोळ सागरी पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
या मृतदेहाचा काही भाग माशांनी खाल्लेला व कुजलेला अवस्थेत आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर चॉकलेटी रंगाची हाफ बर्म्युडा व काळ्या रंगाचा दोरा आहे. १२ दिवसांपासून या मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या मृतदेहाबाबत काेणाला माहिती मिळाल्यास त्यांनी दाभोळ पोलीस स्थानकात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश सावर्डेकर यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष शिंदे, हवालदार राजू मोहिते करीत आहेत.