शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्रातील खुर्च्यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 14:43 IST

चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा विषय चांगलाच गाजत आहे. केंद्राच्या उद्घाटनाची तारीख अजून निश्चित होत नसतानाच सांस्कृतिक केंद्रात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांच्या वाढीव दराचा मुद्दा गाजत आहे. वाढीव दराच्या निषेधार्थ गुरूवारी सकाळी १०. ३० वाजता चिपळूण शहरातून केंद्रातील खुर्च्यांची मिरवणूक काढून निषेध करण्यात आला.

ठळक मुद्दे वाढीव दरामुळे खुर्च्यां वादग्रस्त, सकाळी खुर्च्यांचे पूजन करून मिरवणूकमहाविकास आघाडीचे नगरसेवक सहभागी

चिपळूण : चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा विषय चांगलाच गाजत आहे. केंद्राच्या उद्घाटनाची तारीख अजून निश्चित होत नसतानाच सांस्कृतिक केंद्रात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांच्या वाढीव दराचा मुद्दा गाजत आहे. वाढीव दराच्या निषेधार्थ गुरूवारी सकाळी १०. ३० वाजता चिपळूण शहरातून केंद्रातील खुर्च्यांची मिरवणूक काढून निषेध करण्यात आला.शहरातील सांस्कृतिक केंद्राचा विषय सध्या जोरात गाजत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या धर्तीवर चिपळूण नगर परिषदेतही महाविकास आघाडी स्थापन करण्यात आलेली असली तरी महाविकास आघाडीतच फूट पडल्याचे दिसत आहे. त्यामुहे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. सांस्कृतिक केंद्राच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. नगरसेवकांच्या या आरोपामुळे नगराध्यक्ष विरूद्ध नगरसेवक यांच्यात शाब्दिक युद्धही सुरू झाले आहे.सांस्कृतिक केंद्राच्या कामात वाढीव खर्च, मंजुरी न घेता परस्पर केलेली कामे, खुर्च्यांच्या खरेदीसाठी वाढीव दर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे जनतेला देण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

सांस्कृतिक केंद्राच्या कामाबाबत नगरसेवकांनी विशेष सभेची मागणीही केली होती. त्यानुसार गुरूवारी सकाळी विशेष सभा बोलावण्यात आली होती. तत्पूर्वी नगरसेवकांनी सांस्कृतिक केंद्रात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांची मिरवणूक काढली. खुर्च्यांचे पूजन करून ही मिरवणूक सांस्कृतिक केंद्र ते नगर परिषद अशी काढण्यात आली होती. या मिरवणुकीद्वारे सांस्कृतिक केंद्राच्या कामाचा निषेध करण्यात आला.खुर्ची पूजन रॅलीला चिपळूणमध्ये नागरिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. या रॅलीत नागरिक, नगरसेवक आणि महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी