शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवने-करंबेळे गावच्या सीमेवर रंगला ग्रामदेवतेच्या पालखी भेटीचा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 18:58 IST

देवरुख : ढोल-ताशांचा गजर, ग्रामदेवतेच्या नावाचा जयजयकाराने हजारो भाविकांच्या उपस्थितीत संगमेश्वर तालुक्यातील शिवने व करंबेळे गावच्या सीमेवर ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा ...

देवरुख : ढोल-ताशांचा गजर, ग्रामदेवतेच्या नावाचा जयजयकाराने हजारो भाविकांच्या उपस्थितीत संगमेश्वर तालुक्यातील शिवने व करंबेळे गावच्या सीमेवर ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा अनोखा सोहळा आज, शनिवारी सायंकाळी रंगला. हा भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.तालुक्यातील करंबेळे - शिवने येथील सीमेवर देवरुख-संगमेश्वर मार्गावर दोन बहिणीच्या पालख्यांची आगळीवेगळी भेट पाहण्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित होते. ही पालख्यांची भेट म्हणजे केवळ दोन गावातीलच नव्हे तर तालुक्यातील भक्तगणांसाठी एक मोठा सोहळाच असतो.  आजूबाजूच्या गावातील शिमगोत्सव संपन्न झालेले असल्याने करंबेळे व शिवने गावच्या सीमेवर होणारी दोन बहिणींच्या पालकीची भेट पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. शिवणे गावच्या पालखीतील ग्रामदेवता रवळनाथ, नवलाई, व पावणाई असून करंबेळे गावच्या पालखीत ग्रामदैवत गांगोबा, देवी निनावी व वाघजाई अशी ग्रामदैवत असतात.भेटीमध्ये ओटींची अदलाबदलशनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दोन्ही गावातील पालखी वाजत गाजत जल्लोषात सीमेवर आणण्यात आल्या. दोन्ही पालख्यांची  भेट घडवून आणताना भक्तगण आपल्या खांद्यावर भक्तांना उभे करून त्यांच्या खांद्यावर दोन्ही पालख्या देतात व ही अनोखी भेट घडवून आणली जाते. या वर्षी ही भेट दुपारी ३.१५ वाजता घडली. या भेटीमध्ये दोन्ही पालख्यांमधील ओटींची अदलाबदल होते ही या पालखी भेटीचे वैशिष्ट्य आहे.भेटी नंतर शिवने गावच्या हद्दीत दोन्ही पालख्या नाचविल्या जातात. यावेळी शिवने येथे गाऱ्हाणी, नवस बोलले जातात. त्यानंतर करंबेळे गावची देवी आपल्या शिवने गावच्या बहिणीला म्हणजेच ग्रामदेवतेच्या पालखीला पाच पावले पुढे जाऊन निरोप देते. पूर्वीच्या काळी हे दोन गाव एकच होते. त्यानंतर गाव वेगवेगळे झाल्या नंतर या दोन पालख्यांची म्हणजेच बहिणींनीची भेट प्रतिवर्षी घडविली जाते. अशी आख्यायिका सांगितली जाते.उत्सवादरम्यान मार्गाच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती. या ठिकाणी मोठी यात्रा भरली होती. आबालवृद्धांनी  या पालखी भेट सोहळाचा आनंद लुटला.  दरम्यान सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्गावर वाहतुकीमध्ये कोणताही अडथळा होऊ नये यासाठी देवरुखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव  व संगमेश्वरचे निरीक्षण उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी