लांजा : बँक ऑफ इंडिया, शाखा वेरवली बुद्रुक या शाखेचा ११६ वा स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्राहक व बँक अधिकारी, कर्मचारी यांनी केक कापून स्थापना दिवस साजरा केला.
यावेळी ग्राहकांनी वेरवली शाखेचे बँक प्रबंधक नारायण सिगोते यांनी मार्गदर्शन करून बँकेच्या विविध योजना व सेवांबाबत माहिती दिली. त्यानंतर स्थापना दिनाचे औचित्य साधून ग्राहकांना यावेळी वाहन कर्ज, कृषी कर्ज, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग कर्ज, अशा विविध कर्जांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला बँक ऑफ इंडिया, वेरवली बुद्रुक शाखेचे प्रबंधक नारायण सिगोते, नितीन उघाडे, प्रभूकल्याण मोहपत्र, राकेश कोळवणकर, प्रवीण पड्यार, पोलीस पाटील प्रभाकर कुळ्ये उपस्थित होते.