सेंद्रीय भात लागवड प्रात्यक्षिकातून कृषी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:02+5:302021-07-03T04:21:02+5:30

दापाेली : कृषी दिनाचे औचित्य साधून काेकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. ...

Celebrate Agriculture Day with a demonstration of organic rice cultivation | सेंद्रीय भात लागवड प्रात्यक्षिकातून कृषी दिन साजरा

सेंद्रीय भात लागवड प्रात्यक्षिकातून कृषी दिन साजरा

दापाेली : कृषी दिनाचे औचित्य साधून काेकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने सेंद्रीय शेती संशाेधन व प्रशिक्षण प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांकरिता ‘सेंद्रीय भात लागवड व उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर एकदिवसीय प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाची प्रस्तावना, विषयाची गरज प्रकल्पप्रमुख डाॅ. प्रशांत बोडके यांनी सांगितली. सेंद्रीय शेतीत येणाऱ्या अडचणी व त्यांवरचे उपाय यावर सहयोगी अधिष्ठाता डाॅ. यू. व्ही. महाडकर यांनी मार्गदर्शन केले. विषमुक्त अन्न मिळण्यासाठी सेंद्रीय शेती करणे गरजेचे आहे, असे मत विस्तार शिक्षणचे संचालक डाॅ. संजय भावे यांनी व्यक्त केले. डाॅ. संताेष वरवडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्रमोद चिखलीकर यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. सहाय्यक प्राध्यापक डाॅ. व्ही. ए. राजेमहाडिक यांनी आभार मानले. कार्यक्रमामध्ये प्रकल्पातील वरिष्ठ संशाेधन छात्र डाॅ. वाय. ए. गावकर व ए. एस. पोळ यांनी अनुक्रमे ‘बीजामृत व जीवामृत निर्मिती’ व ‘सेंद्रीय नियंत्रित भात लागवड तंत्रज्ञान’ या विषयाचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण होण्याकरिता डाॅ. सानिका जोशी व अन्य कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Web Title: Celebrate Agriculture Day with a demonstration of organic rice cultivation