शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे तयार होईनात गड-किल्ले; बच्चे कंपनीमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 14:11 IST

पावसामुळे मोकळ्या जागेत किल्ले उभारणे अशक्य असल्याने सध्या तरी इमारतींच्या बेसमेंटमध्ये किल्ले तयार करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमातीचे किल्ले बनविण्यासाठी शहर, गावांमध्येही अनेक स्पर्धांचे आयोजन

रत्नागिरी : बच्चे कंपनीची परीक्षा संपून गुरूवारपासून दीपावलीची सुटी सुरू झाली. दीपावलीत बच्चे कंपनी खास मातीचे किल्ले तयार करते. मात्र, पावसामुळे किल्ले तयार करण्यात अडचण निर्माण झाल्याने बच्चे कंपनीमध्ये नाराजी आहे. शहरात काही मंडळांतर्फे आकर्षक किल्ले स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असले तरी पावसामुळे किल्ले कुठे तयार करावे, असा प्रश्न आहे.ग्रामीण भागात दिवाळीपूर्वी घरासमोर अंगण तयार केले जात असे. अंगणातील एका कोपºयात मातीने लिंपून किल्ला तयार करण्यात येत असे. परंतु, केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातदेखील किल्ले तयार केले जातात. कोणत्या तरी एका किल्ल्याची संकल्पना घेऊन मोठ्यांच्या सहकार्यातून किल्ले तयार केले जातात. माती लिंपून किल्ले तयार करण्याबरोबरच आकर्षक गढी किंवा बुरूजही उभारण्यात येतात. काही ठिकाणी काल्पनिक तर काही ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती बनवली जाते. शिवाय किल्ल्यांना आकर्षक रंगरंगोटीदेखील करण्यात येत आहे.मेथी, मोहरी टाकून हिरवळ उगविण्यात येते. पूर्वी बच्चे कंपनी खेळण्यातील बाहुल्या किंवा शोभेच्या वस्तूंनी किल्ल्याचे सुशोभिकरण करीत असत. मात्र, आता तयार मावळे, शिवाजी महाराज तसेच प्राणी इतकेच नव्हे तर रेडिमेड किल्लेदेखील बाजारात विक्रीला उपलब्ध आहेत. १० ते ५० रूपयांपर्यंत मावळे, शिवाजी महाराजांच्या मूर्ती विकण्यात येत आहेत. तर तयार किल्ले १५० ते ३०० रूपयांपर्यंत विकण्यात येत आहे. पावसामुळे मोकळ्या जागेत किल्ले उभारणे अशक्य असल्याने सध्या तरी इमारतींच्या बेसमेंटमध्ये किल्ले तयार करण्यात येत आहेत.शहरातील फ्लॅट संस्कृतीमध्ये गॅलरीच्या कोपऱ्यात हा किल्ला ठेवून सुशोभिकरण केले जाते किंवा इमारतीच्या बेसमेंटमध्ये किल्ला उभारण्यात येत आहे. छोट्या-छोट्या हाताने माती भिजवून ती लिंपून दगड किंवा विटांचे तुकडे यांच्याद्वारे सुशोभिकरण करून रंगरंगोटी केली जाते. पाण्याची कारंजी किंवा धबधबेदेखील दाखविण्यात येतात.किल्ले बनविले जाणारकिल्लाप्रेमी मंडळांकडून किल्ले बनविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असले तरी पावसामुळे किल्ले तयार करण्याच्या कामात व्यत्यय येत आहे. रत्नागिरीतील भाट्ये, मांडवी किनाºयांवर बच्चे कंपनीकडून असे किल्ले तयार केले जातात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFordफोर्ड