शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘कॅस्पर’च्या मृत्यूने लावला चटका, मालकाच्या विरहाने झुरुन सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 17:50 IST

धरणात मालकाला बुडताना पाहून ‘कॅस्पर’ श्वानानेही पाण्यात उडी मारली. बराचवेळ त्याने पाण्यात त्यांचा शोधही घेतला. पण, मालकाचा कोठेच शोध न लागल्याने तो माघारी परतला. अन् मालकाच्या आठवणीत घरी आलेल्या ‘कॅस्पर’ने आपले प्राण सोडले.

संजय सुर्वेशिरगाव : कोळकेवाडी धरणात मालकाला बुडताना पाहून ‘कॅस्पर’ श्वानानेही पाण्यात उडी मारली. बराचवेळ त्याने पाण्यात त्यांचा शोधही घेतला. पण, मालकाचा कोठेच शोध न लागल्याने तो माघारी परतला. मात्र, पुन्हा त्याला त्याठिकाणी गेला असता मालकाच्या आठवणीत घरी आलेल्या ‘कॅस्पर’ने आपले प्राण सोडले. सुजय गावठे याच्या आठवणीत ‘कॅस्पर’ने प्राण सोडताच सारेच हळहळले.माणसापेक्षा मुकी जनावरे खूप प्रामाणिक असतात हे अलोरे येथील सुजय गावठेच्या ‘कॅस्पर’ श्वानाने दाखवून दिले. दोन दिवसांपूर्वी कोळकेवाडी धरणात चौघेजण बुडल्याची घटना घडली होती. यात दोघेजण वाचले तर अन्य दोघेजण बुडाले. त्यातील ऐश्वर्या खांडेकर हिचा मृतदेह सापडला. मात्र, सुजय गावठे हा अद्यापही बेपत्ता आहे.या घटनेवेळी सुजय बुडत असल्याचे पाहून त्याचा लाडका श्वान ‘कॅस्पर’नेही पाण्यात उडी मारली आणि मोठ्यामोठ्याने भुंकू लागला. मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याचे प्रयत्न असफल ठरले. पाण्यात पोहत पोहत तो तांबडवाडीमध्ये बाहेर पडला. त्यानंतर त्याला घरात आणण्यात आले. घरामध्ये आल्यानंतर तो खूप शांत होता. त्याने काहीही खाल्ले नाही. आपला मालक परत येईल याची तो वाट पाहू लागला आणि त्याने या घटनेचा धसकाच घेतला.दुसऱ्या दिवशी त्याला कोळकेवाडी येथे घटनास्थळी नेण्यात आले. त्या ठिकाणी सुजयला शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु, आपला मालक त्याला कुठेही दिसला नाही. त्यामुळे तो व्याकुळ झाला आणि तेथून तो घरी परतला. घरी आल्यानंतर मात्र त्याने अन्नाचा त्यागच केला आणि घराच्या अंगणातच त्याने प्राण सोडला. जिथे सुजय तिथे त्याचा लाडका ‘कॅस्पर’ हे एक समीकरण बनले होते. अनेकदा मालकासोबत दुचाकीवर बसून फेरी मारण्याचा आनंद ‘कॅस्पर’ घ्यायचा. बेपत्ता झालेला आपला मालक घरी न आल्याने या श्वानाने माणसापेक्षाही मोलाची निष्ठा मालकाप्रती जपली आणि आपल्या प्राणाचा त्याग केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdogकुत्राdrowningपाण्यात बुडणे