काेरोनाचे ३१० नवे रुग्ण, ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:34 AM2021-05-11T04:34:08+5:302021-05-11T04:34:08+5:30

रत्नागिरी : रविवारी चाचण्या कमी होत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी ३१० कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दिवसभरात कोरोनाने ११ रुग्णांचा बळी ...

Carona 310 new patients, 11 deaths | काेरोनाचे ३१० नवे रुग्ण, ११ जणांचा मृत्यू

काेरोनाचे ३१० नवे रुग्ण, ११ जणांचा मृत्यू

Next

रत्नागिरी : रविवारी चाचण्या कमी होत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी ३१० कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दिवसभरात कोरोनाने ११ रुग्णांचा बळी घेतला, तर ६०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७,२७१ झाली आहे.

दर रविवारी चाचण्या कमी होत असल्याने सोमवारी जाहीर होणाऱ्या अहवालात रुग्णसंख्या घटते. दररोज ५०० हून अधिक रुग्ण सापडत असताना सोमवारी ३१० रुग्ण आढळले. रत्नागिरी तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या अजूनही जास्त असून, सोमवारी १२० रुग्ण आढळले. मंडणगडमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही. दापोलीमध्ये १४ रुग्ण, खेडमध्ये ११, गुहागरात ६, चिपळुणात ७६, लांज्यात १२ आणि राजापुरात ४१ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता २७,२७१ झाली असून, पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण १६.४८ टक्के आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांतील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. सोमवारी देण्यात आलेल्या अहवालानुसार चिपळूण तालुक्यातील ४ रुग्ण, रत्नागिरीतील ३ आणि दापोली, गुहागर, संगमेश्वर, लांजा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात ८१५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित मृत्यूचे प्रमाण २.९८ टक्के आहे. आतापर्यंत २१,३७८ रुग्ण बरे झाले. हे प्रमाण वाढले असून, ते ७८.३९ टक्के इतके आहे.

Web Title: Carona 310 new patients, 11 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.