शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लांजावासियांचा तब्बल तीन तास महावितरण अधिकाऱ्यांना घेराओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 17:37 IST

महावितरण लांजा सारख्या कार्यालयात अधिकारी नाहीत त्यातच प्रभारी अधिकारी समर्पक उत्तरे देत नसतील तर नागरिकांची कामे वेळेत कशी होणार, असा संतप्त सवाल करून अशा रिकाम्या खुर्च्या दिसल्या तर बाहेर फेकून देऊ, असा सज्जड इशारा लांजा तालुक्यातील सर्वपक्षीय लोकांनी महावितरणच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देलांजावासियांचा महावितरण अधिकाऱ्यांना घेराओ तब्बल तीन तास घेराओ, अधिकाऱ्यांना धारेवर धरले

लांजा : महावितरण लांजा सारख्या कार्यालयात अधिकारी नाहीत त्यातच प्रभारी अधिकारी समर्पक उत्तरे देत नसतील तर नागरिकांची कामे वेळेत कशी होणार, असा संतप्त सवाल करून अशा रिकाम्या खुर्च्या दिसल्या तर बाहेर फेकून देऊ, असा सज्जड इशारा लांजा तालुक्यातील सर्वपक्षीय लोकांनी महावितरणच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिला.

लांजा महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराविरोधात तालुक्यातील नागरिकांनी लांजा महावितरण कार्यालयावर धडक देऊन प्रभारी अधिकारी सरदेसाई यांना तब्बल तीन तास घेराओ घालून चांगलेच धारेवर धरले.यावेळी तालुक्यातील विवली, बेनी खुर्द, खेरवसे या ठिकाणी तब्बल आठ ते दहा दिवस वीज नसल्याने संतप्त झालेले ग्रामस्थ आणि लांजा शहरात सातत्याने वीज जाण्याचे प्रकार, गंजलेले पोल, आणि महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे अवास्तव आलेली विद्युत बिले, नवीन मीटर उपलब्ध नसल्याने विद्युत कनेक्शन देण्यासाठी होणार उशीर अशा सर्व समस्यांविरोधात नागरिक धडकले होते.महावितरणच्या लांजा कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारीच नाहीत जे होते त्यातील बरेचजण प्रभारी कामकाज सांभाळत होते. याबाबत विचारले असता हा प्रश्न आम्ही सोडवू शकत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याठिकाणी येणारा माणूस ज्या अधिकाऱ्यांकडे समस्या मांडतो. तो पुन्हा त्या कार्यालयात दिसत नाही. त्यामुळे समस्या तशाच राहतात.विवली गावात आणि खेरवसे गावात ट्रान्सफार्मर नसल्याने विद्युत पुरवठा बंद आहे. तो चौवीस तासाच्या आत बसला पाहिजे आणि विद्युत पुरवठा सुरळीत झाला पाहिजे या मागणीवर उपस्थित ठाम राहिले. अखेर अधिकाऱ्यांनी रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधून दोन ट्रान्सफार्मरची व्यवस्था केली. सायंकाळपर्यंत आणले जातील याची हमी दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी